Thursday, November 1, 2018

टेलरच्या दूकानास आग लागून पावनेतीन लाखाचे साहित्य जळून खाक

टेलरच्या दूकानास आग लागून पावनेतीन लाखाचे साहित्य जळून खाक.
 नायगाव(प्रतिनिधि)
शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेल्या आरून टेलर दूकानास अचानक लागलेल्या आगेत दूकानातील शिवलेली कपडे व शिवायचे असलेल्या कपड्यासह शिलाई मशिन व दूकानातील इतर पावनेतीन लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना दि.३१ आँक्टोंबर रोजी सांयकाळी ८:४५ च्या सुमारास घडली असुन सदरील घटनेचा पंचनामा तलाठी एस.ऐ.शिंदे यांनी केले आहे.
         सविस्तर माहिती अशी की टाकळी (खू) तालुका बिलोली येथील रहिवाशी अरून मोहण लिंगनवार हे आपल्या कूटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेल्या अनेक वर्षापासुन शंकरनगर येथे टेलरीगंचे दूकान टाकून दूकानात कूटूंबातील सर्व व्यक्ती कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत होते ते नेहमी प्रमाणे दि ३१ आँक्टोबर रोजी सांयकाळी ७.३० वाजे पर्यंत कपडे शिवून दूकान बंद करून घरी गेले असता ८.४५ वाजता अचानक दूकानालस आग लागल्याचे दिसुन आले असता दूकानचे शेटर उघडून आग विझवे पर्यंत दूकानातील दिपावली सनाची शिवलेली ८० ड्रेस,१ लाख २४ हजार, शिवायची असलेली ५० ड्रेस ६० हजार, दूकानतील छोटे ४ शिलाई मशिन व एक मोठी शिलाई मशिन अशा पाच मशिन किमंत ७१ हजार या सह दूकानातील कूलर,फॅण,काँन्टर,यासह इतर साहित्य जळून सुमारे २ लाख ७८ हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे.
 अरून लिंगनवार व त्यांचे कूटूंब यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन दूकान हे होते पंरतू सदरील दूकान हे जळून खाक झाल्याने लिगंनवार कूटूंबियावर दिपावली सनावरच उपासमारीची वेळ आली असल्याने सबंधीत लोकप्रतिनिधि व प्रशासनाने तत्काळ  मदतकरावी अशी मागणी केल्या जात असुन अरून लिंगनवार यांनी घडलेल्या घटनेची माहिती रामतीर्थ सज्जाचे तलाठी एस.ऐ.शिंदे यांना दिली असता शिंदे यांनी दि.०१नोहेबंर रोजी सकाळी ०९ च्या सुमारास घटना स्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा केला आहे .

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...