विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाच्या दौऱ्यावर
१४ व १५ नोव्हेंबरला लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व बुलडाणा जिल्ह्यात पाहणी करणार
मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०१८:
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील १४ व १५ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते अनेक खेड्यांना भेटी देऊन दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करतील.
नियोजित कार्यक्रमानुसार, बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ते उजनी, ता. औसा, जि. लातूर येथे शेतकरी व शेतमजुरांशी चर्चा करून पाहणी करतील. सकाळी ११ वाजता ते औसा तालुक्यातील बेलकुंड येथे पाझर तलाव व विहिरीची पाहणी करून शेतमजुरांशी चर्चा तर दुपारी १२ वाजता याच तालुक्यातील हिप्परगा येथे पाझर तलावाची पाहणी करणार आहेत.
विरोधी पक्षनेते बुधवारी दुपारी १.३० वाजता उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे शेतमजुरांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतील, तर दुपारी ३.१५ वाजता लोहारा येथे दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करतील.
राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
गुरूवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५० वाजता ते औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील आत्महत्या करणारे शेतकरी शिवाजी कराळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. सकाळी ९.३० वाजता ते चौंडी शहापूर येथे नाला खोलीकरणाची पाहणी करणार आहेत.
विखे पाटील गुरूवारी दुपारी १२.३० वाजता बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मोहखेड येथे दुष्काळाची व जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करतील. यावेळी ते शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १.२० वाजता ते चिखली येथील नाफेडच्या खरेदी केंद्रास भेट देतील. दुपारी १.४५ वाजता ते चिखली शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधतील

No comments:
Post a Comment