Saturday, November 3, 2018

ट्रेनी महिला पोलिसांचा 'हैदोस'; पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

ट्रेनी महिला पोलिसांचा 'हैदोस'; पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!
पटना - महिला पोलिस सहकाऱ्याचा मृत्यूच्या विरोधात संतापलेल्या ४०० ट्रेनी पोलिस कॉन्स्टेबलांनी (त्यामध्ये सर्वांधिक महिला) अक्षरशः हैदोस घालून मालमत्तेचे जबर नुकसान केले. बुद्ध कॉलनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोधीपूर परिसरात ही घटना घडली. इतकेच नव्हे तर या ट्रेनी पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबड उडाली आहे. सविता पाठक (२२) ही ट्रेनी पोलिस कॉन्स्टेबल डेंग्यूने आजारी होती. तिला रजा नाकारण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवत ट्रेनी पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक महंमद मशलुद्दीन यांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता त्या ४०० पोलिसांच्या जमावाने ग्रामीण पोलिस अधीक्षक, पाटणा मध्य आणि पूर्वचे पोलिस अधीक्षक तसेच उप पोलिस अधीक्षक यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  या हल्ल्यामध्ये काही पोलिस अधिकारी जखमी झाले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांना घटनास्थळावर येण्यास ४० मिनीटे उशीर झाल्याने या पोलिसांनी अधिकच उद्रेक केला. मृत झालेल्याला सविताला गेल्या तीन दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही सुट्टी देण्यात आली नाही. उप पोलिस अधीक्षकांनी सविता गंभीर आजारी असतानाही कारगिल चौकामध्ये तिला ट्रॅफिक ड्युटीवर पाठवून देण्यात आले. बुधवारी सकाळी सविताला रुग्णालयात दाखल केले होते, पण काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. या अभूतपूर्व झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पोलिस संचालक के.एस.द्विवेदी यांच्याकडून अहवाल मागवला आहे. ट्रेनी पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तोडफोड केली. पोलिसांनी हैदोस घालायला सुरुवात केल्यानंतर संतापलेल्या स्थानिकांनी त्यांच्यावर दगड आणि वीटा फेकून मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही त्यांच्यावर दगडफेक केली.त्याचबरोबर पोलिस लाईनवरही हल्ला चढवला. या चाललेल्या भयानक प्रकारात १० जण जखमी झाले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...