Monday, December 23, 2019

भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मियाँ यांचे निधन

भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मियाँ यांचे निधन



भोकर तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमीद उर्फ गोरे मिया यांचे  दि. 13-12-2019 शुक्रवार रोजी निधन झाले असून त्यांच्या निधनाची माहिती कळताच त्यांच्या चाहत्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे अब्दुल हमीद उर्फ गोरे काका यांचा मोठा परिवार असून त्यांना सात मुले व तीन मुली असून त्यांचा नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे आणि ते भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी शेख मुजाहिद ऊर्फ मुज्जू भाई यांचे वडील होते त्यांची गल्ली चिखलवाडी येथील लोक व तेथील मस्जिदीचे सदर त्यांच्या मते गोरे काकांचा निधन झाल्या मूळे आमच्या गल्लीतील छत हरवल्यासारखं वाटत आहे गोरे काका हे  एक प्रमाणिक व्यक्ती मत्त्व असणारे व्यक्ती असून ते सर्व छोट्या- मोठ्यांना प्रेरणा देणारे होते आणि रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांनी देत असलेल्या आवाजाने लोक सहेरी करत असे आणि ते घरोघरी सकाळी तीन वाजेच्या सुमारास तेथील लोकांना नमाज व सहेरी रोजा साठी लोकांना उठवत होते त्यांच्या सारखा नेक ह्रदयाचा माणूस आम्हा लोकांना पुन्हा लाभणार नाही असे तेथील मस्जिदचे सदर यांनी सांगितले

धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन व्हावे- सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे यांचा डॉ.आंंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मान

धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन व्हावे-
सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे यांचा डॉ.आंंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मान



हिमायतनगर(प्रतिनिधी)
   भोकर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पाटील जळगावकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न भवरे यांचेसह मान्यवराच्या हस्ते पुरस्काराचे सन्मान पत्र व समृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.


  रविवार दि.२२ डिसेंबर२०१९ रोजी सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण नांदेड तर्फे आयोजित बौद्ध धम्मपरिषदेत हा गौरव पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला आहे.


भोकर तालुक्यातील बहुजन आंबेडकरी चळवळीत लक्ष्मण अमृता हिरे यांचे मोलाचे योगदान आहे.दलित पँथर या लढाऊ संघटनेत कार्यरत असतांना मराठवाडा विद्यापीठ नामांतरासह बेघर झोपडपट्टीवासीय भुमिहीन गायरान कास्त काराच्या प्रश्नावर अनेकवेळा मोर्चे आंदोलने केली.ओबीसी,दलित-आदिवासी भटक्या  वंचित घटकांवर झालेल्या अन्यायाच्या न्यायहक्कासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला.बहुजन समाजाचे संघटन प्रबोधन व्हावे या उधेशाने अंधश्रदा निर्मुलनासह विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम  राबविली पत्रकारिता क्षेत्रात ते १९९१पासून  निर्भिडपणे लिखान करून सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केला.त्यांच्या कार्याची दखल घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड तर्फे हिरे यांना समता गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

सत्काराला उतर देतांना हिरे म्हणाले धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन झाल पाहिजे थोरसमाज सुधारकांचे विचार प्रत्येकांच्या घरी गेले पाहिजेत. भगवान बुध्दाचा धम्म मानवाच्या कल्याणासाठी आहे.तो आचरणात आणावा इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील दोष प्रथम शोधाले पाहिजेत!माझ्या कार्याची दखल घेवून सन्मान केलात त्याबद्दल मी आपला श्रृणी असून हजारो जनते समोर दिलेला पुरस्कार मोठा सन्मान आहे. शासनाकडे डॉ.बा.आंबेडकर समाज भुषण पुरस्कारासाठी ३ वेळा प्रस्ताव दाखल केला परंतु राजकीय लग्गेबाजीमुळे तो मिळाला नसल्याची खंत हिरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार माधवराव पा.जळगावकर यांनी धम्म परिषदेला शुभेच्छा दिल्या यावेळी  प्रकाश गायकवाड माहूर,हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे,विजय कांबळे, शिलवंत वाढवे,डॉ.इरवंत पल्लेवाड,बालाजी नागमवाड,प्रा.एस.के.चव्हाण,एम.डी.गुरपवाड,प्रा.पंजाब शेरे यांचाही यथोचित गोरव करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्या जोत्सना नरवाडे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,माजी सभापती जोगेद्र नरवाडे, दिलिप शिंदे,अनिल मादसवार,भिमराव कावळे,शेख खयुम,उतम कानिंदे, भिमराव दुधारे,बी.एस.सरोदे,दता डोंगरे,अनिल डोईफोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन डॉ.मनोज राऊत यांनी केले तर आभार लक्ष्मण भवरे यांनी मानले.रात्रीला बुध्द भीम गिताचा  बहारदार कार्यक्रम झाला.

Friday, December 20, 2019

भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन मंजुर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात भोकरमधे मुक मोर्चा व धरणे

भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन मंजुर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात भोकरमधे मुक मोर्चा व धरणे

   


एजास कुरेशी भोकर
भोकर : भारतीय राज्य घटना हि न्याय, समता आणी बंधुता या मुलभुत तत्वांवर आधारीत असुन यातील महत्वाचे कलम १५ अन्वये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, धर्म, वंश,जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीचे आधारावर भारतीय समाजात भेदभाव करता येणार नाही. मात्र मुलतत्ववादी भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधानातील वैधानीक तत्वांना छेद दिला जात असुन भारतात जन्मलेल्या व पुर्वापात रहिवासी असलेल्या मुस्लीम समाज बांधवांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली जात आहे हे नागरीकता सशोधन विधेयक पारीत करुन  सरकारने सर्व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.



      नागरिकता संशोधन विधेयाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत आहे या पार्श्र्वभुमीवर सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि.२० डिसेंबर २०१९ रोजी  दुपारी शुक्रवारची नमाज पठण केल्यावर काजी मस्जितीपासून शांततेच्या मार्गाने पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मार्गाने
 तहसील कार्यालया पर्यंत शेकडो मुस्लीम बांधव मुक मोर्चाव्दारे तहसीलदार भोकर  यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.
      सदर निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत ११ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल २०१९ (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अ‍ॅक्ट १९५५ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या नागरीकांवर अन्याय करणारे हे विधेयक आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे आहे.

      सदरचे नागरिकता संशोधन विधेयक हे नागरिकांच्या सार्वभौम अधिकार कर्तव्यांची पायमल्ली करणारी बाब असुन या बाबत महामहिम राष्ट्रपतींनी पुनर्विचार करुन भारतीयत्व आणी भारतीय राज्य घटनेत अंतर्भुत करण्यात आलेल्या तत्वांनुसार योग्य ते बदल करुन बहुसंख्य मुस्लीम समाज बांधवांना आपण भारतीय असलेला सार्थ अभिमान हा भविष्य काळातही निर्वीवाद राहावा या दृष्टीने पावले उचलावीत असे सदर निवेदनात नमुद केले आहे.

धरणे आंदोलनात  मौलाना हाफिज,मौलाना उमर फारूक,मुफ्ती फुरखान,मौलाना रिजवान सरवरी,मौलाना रियाज, मौलाना हाफिस सद्दाम, मुफ्ती खुर्शीद  साहेब,मौलाना शुजाओद्दीन, ऍड मो. सलीम ऍड मुजाहेद्द खतीब,मजीद लाला,सहित शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते

Saturday, December 14, 2019

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावेत- एम.जी वाघमारे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावेत- एम.जी वाघमारे




  भोकर( प्रतिनिधी ) शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्यास विद्यार्थी हा येणाऱ्या काळास कवेत घेईल असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी केले.

तालुक्यातील हाळदा संकुलाची ०३री केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज (दि14 )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघाळी येथे उत्साहात संपन्न झाली.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य  व सध्याचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम पाटील पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून  शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. वाघमारे ,  शिक्षण प्रेमी सदस्य  दिलीपराव अनंतवाड व गावचे सरपंच बालाजी घुमरे प्रभारी केंद्रप्रमुख प्रल्हाद जोंधळे ,केंद्रीय मुख्याध्यापक इबितदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या शिक्षण परिषदेस केंद्राअंतर्गत असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासासंदर्भात या शिक्षण परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली.  अध्ययन निष्पत्ती , Diksha app , आनापान, सगुन पोर्टल  आदी संदर्भात प्रशासकीय सूचना येथे देण्यात आल्या. या परिषदेत तज्ञ साधन व्यक्ती म्हणून सहशिक्षक खेराव, सहशिक्षक खांडरे  व सहशिक्षक व्यवहारे  तसेच  सहशिक्षक पवनकर यांनी आपल्या अमोघ  वक्तृत्व शैलीतून सर्व शिक्षकांना मंत्रमुग्ध करत विषय ज्ञानाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला.  शिक्षण परिषद सुरळीत व अत्यंत नियोजन पद्धतीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संपन्न झाली.
 येथील मुख्याध्यापक तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शाळेच्या शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.


प्राथमिक शाळा मोघाळी येथील मुख्याध्यापक रामदास तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.

संकुल कन्या भोकरची केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न

संकुल कन्या भोकरची केंद्रस्तरिय शिक्षण परिषद संपन्न



भोकर, (प्रतिनिधी) दि. १४
 भोकरच्या संकुल कन्या ची ३री केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रातर्गत जि.प. प्रा.शा.गोपीतांडा येथे संपन्न झाली असुन परिषदेचे अध्यक्षस्थानी श्री नाईक होते तर उद्घाटक संकुलाचे प्रमुख जकियोद्धीन शेख हे होते. यावेळी केंद्रिय मु.अ.सुधिर सुरंगळीकर,सरपंच श्री करपे आदी उपस्थित होते.
या परिषदेत केंद्रातर्गत बारा शाळेतील मुख्याध्यापक,व शिक्षक उपस्थित होते.
 सुंदर अशा भौगोलिक व निसर्गरम्य असलेल्या गोपीतांडा व हरीतांड्याच्या विधार्थ्यानी  प्रारंभी स्वागत गाऊन  उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गावचे सरपंच श्री करपे हे दोन्ही शाळा डिजिटल करण्यासाठी एलईडी देण्याचे आश्वासन दिले व एका महिन्यात शाळा डिजिटल होईल असे शाळेचे मुख्याध्यापक रमेश डूमलवाड यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख जे.एम. शेख यांनी केले.
 दुसऱ्या सत्रात मित्र उपक्रमांतर्गत आनापानाचे महत्व, विषद करून  कन्या शाळेचे शिक्षक मिलिंद जाधव यांनी मार्गदर्शन  केले. दिक्षा अॅप व सगुन कार्यक्रमांबद्धल ची माहिती जितेंद्र गवळे यांनी दिली.परिषदेच्या यशस्वितेसाठी हरीतांडयाचे मुअ अक्कलवाड, नरसिंग पसनूरवार आदी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मठपती तर आभार रमेश डुमलवाड यांनी मानले.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...