आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी घडवावेत- एम.जी वाघमारे
भोकर( प्रतिनिधी ) शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्यास विद्यार्थी हा येणाऱ्या काळास कवेत घेईल असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी केले.
तालुक्यातील हाळदा संकुलाची ०३री केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज (दि14 )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघाळी येथे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य व सध्याचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम पाटील पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. वाघमारे , शिक्षण प्रेमी सदस्य दिलीपराव अनंतवाड व गावचे सरपंच बालाजी घुमरे प्रभारी केंद्रप्रमुख प्रल्हाद जोंधळे ,केंद्रीय मुख्याध्यापक इबितदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिक्षण परिषदेस केंद्राअंतर्गत असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासासंदर्भात या शिक्षण परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली. अध्ययन निष्पत्ती , Diksha app , आनापान, सगुन पोर्टल आदी संदर्भात प्रशासकीय सूचना येथे देण्यात आल्या. या परिषदेत तज्ञ साधन व्यक्ती म्हणून सहशिक्षक खेराव, सहशिक्षक खांडरे व सहशिक्षक व्यवहारे तसेच सहशिक्षक पवनकर यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीतून सर्व शिक्षकांना मंत्रमुग्ध करत विषय ज्ञानाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. शिक्षण परिषद सुरळीत व अत्यंत नियोजन पद्धतीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संपन्न झाली.
येथील मुख्याध्यापक तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शाळेच्या शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.
प्राथमिक शाळा मोघाळी येथील मुख्याध्यापक रामदास तोषटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदानी या शिक्षण परिषदेचे सुरेख नियोजन केले होते.

उत्कृष्ठ मार्गदर्शन व नियोजन
ReplyDelete