धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन व्हावे-
सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे यांचा डॉ.आंंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मान
हिमायतनगर(प्रतिनिधी)
भोकर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पाटील जळगावकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न भवरे यांचेसह मान्यवराच्या हस्ते पुरस्काराचे सन्मान पत्र व समृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.
रविवार दि.२२ डिसेंबर२०१९ रोजी सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण नांदेड तर्फे आयोजित बौद्ध धम्मपरिषदेत हा गौरव पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यातील बहुजन आंबेडकरी चळवळीत लक्ष्मण अमृता हिरे यांचे मोलाचे योगदान आहे.दलित पँथर या लढाऊ संघटनेत कार्यरत असतांना मराठवाडा विद्यापीठ नामांतरासह बेघर झोपडपट्टीवासीय भुमिहीन गायरान कास्त काराच्या प्रश्नावर अनेकवेळा मोर्चे आंदोलने केली.ओबीसी,दलित-आदिवासी भटक्या वंचित घटकांवर झालेल्या अन्यायाच्या न्यायहक्कासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला.बहुजन समाजाचे संघटन प्रबोधन व्हावे या उधेशाने अंधश्रदा निर्मुलनासह विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविली पत्रकारिता क्षेत्रात ते १९९१पासून निर्भिडपणे लिखान करून सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केला.त्यांच्या कार्याची दखल घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड तर्फे हिरे यांना समता गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
सत्काराला उतर देतांना हिरे म्हणाले धम्म परिषदेतून समाजाच प्रबोधन झाल पाहिजे थोरसमाज सुधारकांचे विचार प्रत्येकांच्या घरी गेले पाहिजेत. भगवान बुध्दाचा धम्म मानवाच्या कल्याणासाठी आहे.तो आचरणात आणावा इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील दोष प्रथम शोधाले पाहिजेत!माझ्या कार्याची दखल घेवून सन्मान केलात त्याबद्दल मी आपला श्रृणी असून हजारो जनते समोर दिलेला पुरस्कार मोठा सन्मान आहे. शासनाकडे डॉ.बा.आंबेडकर समाज भुषण पुरस्कारासाठी ३ वेळा प्रस्ताव दाखल केला परंतु राजकीय लग्गेबाजीमुळे तो मिळाला नसल्याची खंत हिरे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आमदार माधवराव पा.जळगावकर यांनी धम्म परिषदेला शुभेच्छा दिल्या यावेळी प्रकाश गायकवाड माहूर,हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे,विजय कांबळे, शिलवंत वाढवे,डॉ.इरवंत पल्लेवाड,बालाजी नागमवाड,प्रा.एस.के.चव्हाण,एम.डी.गुरपवाड,प्रा.पंजाब शेरे यांचाही यथोचित गोरव करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्या जोत्सना नरवाडे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,माजी सभापती जोगेद्र नरवाडे, दिलिप शिंदे,अनिल मादसवार,भिमराव कावळे,शेख खयुम,उतम कानिंदे, भिमराव दुधारे,बी.एस.सरोदे,दता डोंगरे,अनिल डोईफोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन डॉ.मनोज राऊत यांनी केले तर आभार लक्ष्मण भवरे यांनी मानले.रात्रीला बुध्द भीम गिताचा बहारदार कार्यक्रम झाला.

No comments:
Post a Comment