भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन मंजुर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात भोकरमधे मुक मोर्चा व धरणे
एजास कुरेशी भोकर
भोकर : भारतीय राज्य घटना हि न्याय, समता आणी बंधुता या मुलभुत तत्वांवर आधारीत असुन यातील महत्वाचे कलम १५ अन्वये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, धर्म, वंश,जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीचे आधारावर भारतीय समाजात भेदभाव करता येणार नाही. मात्र मुलतत्ववादी भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधानातील वैधानीक तत्वांना छेद दिला जात असुन भारतात जन्मलेल्या व पुर्वापात रहिवासी असलेल्या मुस्लीम समाज बांधवांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली जात आहे हे नागरीकता सशोधन विधेयक पारीत करुन सरकारने सर्व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
नागरिकता संशोधन विधेयाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत आहे या पार्श्र्वभुमीवर सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि.२० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी शुक्रवारची नमाज पठण केल्यावर काजी मस्जितीपासून शांततेच्या मार्गाने पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मार्गाने
तहसील कार्यालया पर्यंत शेकडो मुस्लीम बांधव मुक मोर्चाव्दारे तहसीलदार भोकर यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत ११ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल २०१९ (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अॅक्ट १९५५ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या नागरीकांवर अन्याय करणारे हे विधेयक आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे आहे.
सदरचे नागरिकता संशोधन विधेयक हे नागरिकांच्या सार्वभौम अधिकार कर्तव्यांची पायमल्ली करणारी बाब असुन या बाबत महामहिम राष्ट्रपतींनी पुनर्विचार करुन भारतीयत्व आणी भारतीय राज्य घटनेत अंतर्भुत करण्यात आलेल्या तत्वांनुसार योग्य ते बदल करुन बहुसंख्य मुस्लीम समाज बांधवांना आपण भारतीय असलेला सार्थ अभिमान हा भविष्य काळातही निर्वीवाद राहावा या दृष्टीने पावले उचलावीत असे सदर निवेदनात नमुद केले आहे.
धरणे आंदोलनात मौलाना हाफिज,मौलाना उमर फारूक,मुफ्ती फुरखान,मौलाना रिजवान सरवरी,मौलाना रियाज, मौलाना हाफिस सद्दाम, मुफ्ती खुर्शीद साहेब,मौलाना शुजाओद्दीन, ऍड मो. सलीम ऍड मुजाहेद्द खतीब,मजीद लाला,सहित शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते

No comments:
Post a Comment