भोकर मध्ये जश्न ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे उत्साहित साजरा.
भोकर:(एजास कुरेशी) दि. २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी समिति चे अध्यक्ष मुर्तुज़ा खान दौलत खान पठान उर्फ बाबू भाई तमसेकर व उप अध्यक्ष शेख नाज़िम भाई यांच्या अध्यक्षते खाली भोकर येथील सईद नगर येथून सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येऊन मुख्य मार्गाने अंम्बेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गाने ईदगाह मैदानावर पोहचली या निमित्ता ने बस स्टैंड समोर भोकर चे सामाजिक कार्यकर्ते फारूक भाई करखेलिकर यानी शरबत वाटप चा कार्यक्रम ठेवला होता व भोकर चे नगर सेविकास सुवर्णाताई वाघमारे यांनी पानी वाटप केला
जगाला शांतता,सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे प्रेषित मोहमंद पैगंबर (स.) यांचा जन्म दीन जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.
भोकर शहरातील सईदनगर भागात सकाळ पासूनच शेकडो समाजबांधव जमन्यास सुरुवात झाली होती, यात जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर,उपनगरअध्यक्ष प्रतिनिधि शेख युसुब भाई , हामीदखान पठाण, रजाक भाई प्रेसवाले, ताजुद्दीन छन्नू भाई शेरवाले, सामाजिक कार्यकर्ते नाजीम भाई, आणि असंख्य लहान मुले व मुली एकत्र येऊन येथून सजवलेल्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावून त्यावर सामाजिक धून लावून वातावरण आंनदी बनवले होते ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज झाल्यावर जलसाची सांगता झाली असल्याची माहिती ईद-ए-मिलादुन्नबी मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर यांनी दिली आहे.भोकरचे पोलस निरीक्षक आर एस पडवड व भोकर पोलिस सर्व कर्मचारियांचा शॉल व फूल ने सत्कार करण्यात आले.


No comments:
Post a Comment