Friday, November 2, 2018

भोकर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा सेना आणि भारतीय किसान सभे तर्फे आंदोलन

भोकर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा सेना आणि भारतीय किसान सभे तर्फे आंदोलन


भोकर :-( एजास कुरेशी) यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, सोयाबीन आणि कापसाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील विहीर आणि बोअरवेल चे पाणी दसऱ्यानंतर गेले आहे त्यामुळे उतारा खूपच कमी झाला आहे, यासाठी भोकर तालुका शिवसेने तर्फे तहसीलपुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते, तर भारतीय किसान सभेतर्फे सुध्दा निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे, सेनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिकांची आणेवारी ५० % पेक्षा कमी करावी,पीकविमा त्वरीत लागू करावा, वीजबिल माफ करावे, व लोडशेडिंग रद्द करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी, पिंपळढव, पाकी, दिवशी, मसलगा, येथील सिंचन तलावास मान्यता द्यावी, शालेय विद्यार्थ्यांची फिस माफ करावी, अशी मागणी करण्यात आली असून सेनेच्या निवेदनावर तालुकाअध्यक्ष अमोल पवार, सुभाष नाईक,नारायण पा.पोमनाळकर, सुनील जाधव, पांडुरंग वर्षेवार, तर किसान सभेच्या निवेदनावर शिवाजी गायकवाड, दिलीप पोतरे, नागोराव आरलेवाड, साहेबराव जाधव, रमेश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...