भोकर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण क्षमताबांधणी व जनजागृती कार्यशाळा संपन्न.
भोकर (एजास कुरेशी)
नगर परिषदच्या वतीने आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालय व जागरण पहेल-डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद प्रांगणात स्वच्छ सर्वेक्षण 2019 क्षमता बांधणी व स्वच्छता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन यशवीरीत्या करण्यात आले . सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेख युसुफ उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी , विक्रम क्षीरसागर व नगरसेवक शेख गफार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यशाळेस दिनदयाळ अन्तोदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मधील स्थापन करण्यात आलेले बचत गट , शहरातील बहुसंख्य नागरीकासह व सर्व नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थिती दर्शविली. श्री विलास वन्नजे व गोपाल कांबळे यांनी नागरिक व बचत गट स्वच्छता विषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मान्यवराच्या हस्ते बचत गटांना डस्टबिन वाटप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन न.पं.चे श्री सुनील कल्याणकर स.प्रकल्प अधिकारी यांनी केले,. याप्रसंगी न.पं. चे कर निर्धारक श्री अशोक भोसले , राजू पदे स्वच्छता विभाग प्रमुख ,व तसेच प्रमुखाने सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment