भोकर तहसीलवर आज वंचित बहुजन आघाडी व युवा पँथरचा मोर्चा
भोकर(प्रतिनिधी )
तामिळनाडू येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दिल्ली येथे संतरविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्त व इतर अन्य मागण्ययासाठी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी १२वाजता भोकर तहसीलवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी व युवा पँथर व मित्र पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सात मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नमूद केले असून त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.तामिळनाडू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या देशद्रोह यावर कठोर कार्यवाही करा, दिल्ली येथील संत रविदास महाराजांचे मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या जातिवाद यावर कठोर कार्यवाही करून मंदिर पूर्ववत बांधून द्या, शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सात-बारा कोरा करा, भोकर तालुक्यासह नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, भोकर शहरासह तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ऊर्ध्व पैनगंगेचे पाणी भोकरच्या सुधा प्रकल्पात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा,रोजगार हमीची कामे सुरू करून मजूर व बेकारांच्या हाताला कामे द्या,विधवा निराधार व अपंगाचे तुटपुंजे मानधन वाढवून प्रतिमहिना 2000 रुपये मानधन देण्यात यावे आदी मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मोर्चात सर्वानी सहभागी व्हावे आसे आवाहन नगर सेवक केशव मुद्देवाड,नागोराव शेंडगे,बाबाराव राठोड, भारिप तालुका अध्यक्ष सुभाष तेले,राजेश चंद्रे दिलीप राव,एम आय एम चे बाबाखाॅन शेख करीम करखेलीकर सम्राट हिरे संदिप गायकवाड दलित ङोंगरे आदिनी केले आहे

No comments:
Post a Comment