Wednesday, April 10, 2019

वॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

वॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जिल्ह्यात  तीन गुन्हे  दाखल




नांदेड (एजास कुरेशी)
काँग्रेस कार्यकर्त्याना अश्लील शब्द वापरून अपमानास्पद व्हिडीओ व्हाट्सअपच्या वर व्हायरल केल्याची घटना घडली .या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात हनुमान गणेश पवार (रा.निघवा ता.मुदखेड)व राजेश गोविंद पवार रा.निघवा ता.मुदखेड)यांच्या वर राजाराम शंकरराव देशमुख यांच्याफिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हनुमान गणेश पवार हा फिर्यादी यांच्या मोबाईल वर व्हाट्सएप व्हिडीओ क्लिपवर मी हनुमान गणेश पवार रा.निघवा ता.मुदखेड बोलतो मी अशोकराव तसेच कार्यकर्ते यांच्या नावाने अश्लील शब्दात शिवीगाळ केली या प्रकरणी बारड चे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या तक्रारी वरून बारड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी राजेश पवार
रा.निघवा याने पण काँग्रेस च्या लोकबद्धल अश्लिल शब्द वापरले व व्हिडीओ क्लिप वायरल करून आम्हा कार्यकर्त्यांना अपमानित केले वगैरे जवाब दिले सदरील प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्याने फिर्यादी परस्पर कोर्टात दाद मागण्याची समज दिली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर हरणे यांच्या आदेशाने जमादार किडे तपास करीत आहेत.
याच प्रमाणे मुदखेड नगराध्यक्ष हे नरेन्द्र मोदी यांच्या जाहीर सभेला उपस्थित होते.अशी पोस्ट फेसबुकवर व्हायरल करुन बदनामी केल्यामुळे म.गौस अ.नजीबसाब यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात कलम ५०० प्रमाणे दि.६एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच एम आय एम च्या राष्ट्रीयअध्यक्ष खा.आवेसी यांच्या फोटोची बदनामी कारक पोस्ट व्हाट्सएपवर व्हायरल केल्या प्रकरणी एम आय एम च्या तालुकाअध्यक्ष  म.सुलेमान व शहरअध्यक्ष  म.हुसेन यांच्या तक्रारी वरून  मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची  माहिती पोलीस निरीक्षक माच्छरे  यांनी सांगितले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...