Thursday, August 22, 2019

नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची मुंबईला बदली नवीन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर

नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची मुंबईला बदली नवीन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर



नांदेड ()
 राज्याच्या गृहविभागाने आज 22 ऑगस्ट 2019 रोजी दुपारच्या सत्रानंतर जारी केलेल्या आदेशात 4 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांना मुंबईला पाठविण्यात आले आहे.

राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आपल्या स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेशात नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय बालाजीराव जाधव यांची मुंबई शहरात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त पदावर नेमणुक झाली आहे. त्यांच्या जागी नांदेडचे पोलीस अधिक्षक या पदावर सोलापूरचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांना सुध्दा संजय जाधव यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक पदी नागपुर शहरात पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले राजतिलक रोशन यांना पाठविण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांचे आदेश झाल्यानंतर या सर्वांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे संकेत या आदेशात दिले आहेत. हा आदेश राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक 201908221724529229 असा आहे.
दोन दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापुर्वीच संजय जाधव यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...