संत रविदास मंदिर पूर्ववत बांधून देण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन
भोकर :-एजास कुरेशी
भारताची राजधानी दिल्ली येथील तूघलकाबाद येथील श्री संत गुरु रविदास महाराजांचे ऐतिहासिक भव्य व पुरातन मंदिर जातीवादी सरकारने जेसीबीच्या साह्याने पाडून जमीनदोस्त केले आहे, त्याचा निषेध म्हणून भारतात सर्वत्र तीव्र स्वरूपाचे आंदोलने होत आहेत, गुरू रविदास यांचे मंदिर होते त्याच ठिकाणी पूर्ववत बांधून देण्यात यावे या मागणीसाठी अनेक कार्यकर्ते दिल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत, त्या कार्यकर्त्यांवर दिल्ली सरकारने खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्यातचे पाप केले आहे, त्यांना तात्काळ सोडण्यात यावे व गुरु रविदास महाराजांचे मंदिर पूर्ववत तुघलकाबाद येथेच बांधण्यात यावे यासाठी भोकर येथील अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
या निवेदनावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा भोकरचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार रमेश गंगासागरे, सचिव संतोष नरवाडे, बालाजी कंधारे, दशरथ तोडके, शिवराज इंगळे, पंढरी गंगासागरे, संजीव वाघमारे, कैलाश गंगासागरे, गणेश गंगासागरे, सुरेश गंगासागरे, बालाजी गंगासागरे, केरबाजी कदम, आकाश कुंडलकर, सदानंद लिंगमपले, यांच्या सह्या असून या आंदोलनास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे, पत्रकार एल.ए हिरे, भिम शाहीर बाबूराव गाडेकर व भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे.

No comments:
Post a Comment