Sunday, August 11, 2019

पक्षाने आदेश दिल्यास एमआयएम वंचीत कडून बाबा खान विधानसभा उमेदवारी लढवणार !

पक्षाने आदेश दिल्यास एमआयएम वंचीत कडून बाबा खान विधानसभा उमेदवारी लढवणार !




भोकर :नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सपाटून पराभव झाला व काँग्रेस पक्षाच्या विविध पदावरुन मुक्तता झाली असल्याने त्यांनी नांदेड जिल्हा आणि विशेषत: भोकर विधानसभा मतदार संघात राजकीय मोर्चेबांधणी जोमाने सुरु केली आहे.त्यांचे भावी राजकीय अस्तित्व हे भोकर विधानसभा निवडणूक ठरविणार असल्याने चव्हाण कुटूंबीयांनी त्यांच्या पारंपारिक पारिवारीक भोकर विधानसभा मतदार संघास आपले लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूकीत काही स्वपक्षीय व राष्ट्रवादीने त्यांच्या पराभवासाठी मोठा हातभार लावला हे सर्वश्रुत आहे.अशातच
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आले असून भोकर चा राजकारण जोर धरू लागला आहे सर्व पक्षाचे मोर्चे बांधणी सुरू आहेत भोकर मतदार संघातून वंचित बहुजन व एम आई एम कडून बाबा खान पठाण उमेदवारी लढवणार असल्याची माहिती बाबा खान पठाण  यांच्या कडून मिळाली आहे पक्षाला उमेदवारी मागितली आहे पक्षाने आदेश दिल्यास भोकर मधून लढवणार आहे.भोकर मधील युवा पिढीचे चाहते आहेत बाबा खान म्हणून सर्व युवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे बाबा खान ला एक वेळेस उमेदवारी मिळावी आम्ही जिंकून देऊ असे भोकर येथील सर्व एम आय एम च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे
लोकशाहीत मतदान करणे व निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे राहणे हा संविधानिक अधिकार प्रत्येक भारतीय नागरीकास दिला आहे.त्यामुळे एखाद्या नागरीकाने निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात नाविन्य असे काहीही नाही

भोकर विधानसभेचा मागील इतिहास पाहिला तर येथील दलित,बहुजन मतदारांनी तत्कालीन उमेदवार नागनाथ घिसेवाड,डॉ. उत्तम जाधव व किशोर केसराळे यांना प्रस्तापितांच्या विरुद्ध अगदी विजयाच्या उंब-यावर नेऊन ठेवल्याची नोंद आहे.त्यामुळे आगामी निवडणूकीत या मतदारांनी जर पुर्वी सारखीच साथ दिली तर मोठा चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...