Sunday, August 4, 2019

बापूसाहेब गोरठेकर यांची सुलोचनाताई ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ढोले निवासस्थानी घेतली भेट

बापूसाहेब गोरठेकर यांची सुलोचनाताई ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ढोले निवासस्थानी घेतली भेट





भोकर (एजास कुरेशी)
  भोकर येथील काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी शहरअध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुलोचनाताई माधवराव ढोले यांनी आपल्या कार्यकर्त्यां सहित ढोले निवासस्थानी  बापूसाहेब गोरठेकर यांची भेट  घेतली आहे.


सविस्तर वृत्त असे की  भोकर काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते  हे सद्यैव भोकरच्या सामाजिक कामात त्यांची नोंद असतेच व आता ते  बापूसाहेब गोरठेकरच्या नेतृत्वाखाली जनतेचे प्रश्न सोडवतील की काय..? अशी चर्चा सुरू आहे व तसेच त्यांनी कोणताही पद न घेता फक्त बापूसाहेब गोरठेकर यांची भेट घेतली आहे. ढोले हे बापूसाहेब सोबत राष्ट्रवादी मध्ये १० वर्ष इमानदारीने पक्षवाढी साठी काम केलेले आहे काही काळा साठी ते काँग्रेस मध्ये प्रवेश केले होते  भोकर मध्ये सध्या बापूसाहेब गोरठेकर मित्र मंडळ मध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे बापूसाहेब गोरठेकर यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेवून बापूसाहेब जिथे आम्हीं तिथे असा नारा देत बापूसाहेब मित्र मंडळ मध्ये प्रवेश करत आहेत. बापूसाहेब गोरठेकर सोबत सुभाश पाटील घंटलवाड , दत्ता पांचाळ ,तोफिक नगरसेवक,सलीम सर, जवाजोद्दिन बारबडेकर, डॉ फ़ेरोज इनामदार ,मोहन पाटील हसापूरकर ,आनंदराव पाटील, बाबूराव पाटील अंदबोरीकर , शशी पाटील अर्धापुर, दिलीप तिवारी , बाभळीकर , आनंद ढोले,अमोल ढोले आदी सह उपस्थित होते

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...