Monday, August 5, 2019

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेवर गुन्हा दाखल करा....बहुजन रयत पार्टी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेवर गुन्हा दाखल करा....बहुजन रयत पार्टी





भोकर:-एजास कुरेशी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपमानापस्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या व अण्णा भाऊ साठे(महापुरुष) यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या भाष्यामुळे रामदास आठवले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी तक्रार  भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना देण्यात आली आहे बहुजन रयत पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष माधव मेकेवाड ,बालाजी चार्लेवाड(मराठवाडा उपाध्यक्ष),रवी गेंटेवार (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष),स.जब्बार स. (तालुका अध्यक्ष),सय्यद महेमूद(ता.कार्याध्यक्ष),आमेरअली सज्जाद अली(तालुका युवक कार्याध्यक्ष, भोकर) व अन्य बहुजन रयत पार्टी कार्यकर्ते तसेच पत्रकार अरुण डोईफोडे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी देखील भोकर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते .याबाबत अधिक माहिती अशी की ३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जनशताब्दी कार्यक्रमात आठवले यांनी अण्णाभाऊ यांनी लिहलेल्या गीतांचा अपमान करून म्हंटले की माझी मैना गावाकडं राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पहिली. असे भाष्य आठवले यांनी केले. त्यामुळे  अण्णा भाऊ साठेच्या अनुयायांची भावना दुखावल्या आहेत. तसेच आठवले यांच्या या अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि समाजात अशांतता ही पसरवू शकते.त्यामुळे वेळीच त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.


बहुजन रयत पार्टी कार्याध्यक्ष माधव मेकेवाड यांनी बेधडक महाराष्ट्र च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की....
भाजपने आठवले सारख्या बहुजनाच्याच एका गद्दाराला सोबत घेतले आहे.बहुजन समाजाचे हनन एका बहुजन समाजाच्या माणसाच्या हातून कसे करता येईन हे षड्यंत्र भाजप नेहमी आखत असते.लोकशाहीर सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या कडून बहुजन समाज संपूर्ण जागा झाला आहे.त्यांच्या साहित्याच्या लिखाणातून अनेक जण घडले आहेत.असे असताना दिल्लीतून येऊन महाराष्ट्र मध्ये अण्णा भाऊ चे चारित्र्य हनन होईल असे बेताल वक्तव्य त्यांच्या गीतातून केले आहे.ह्या मुळे संपूर्ण अण्णा भाऊ च्या अनुयायीची मने दुखावली आहेत.भाजप आणि RSS च्या लोकांनी बहुजन नेत्याच्या चारित्र्याचे हननांचे कार्य आज पर्यंत केलेले आहे आशा लोकांना भाजपने समर्थन केलेले आहे.आता आठवले सारख्या स्वार्थी माणसाला महापुरुष अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य  करण्यासाठी सांगितले आहे.हे सर्व भाजप च्या सांगण्यावरून आठवले महाराष्ट्र मध्ये आले आणि असे बोलून गेले ह्या गोष्टीचा बहुजन रयत पार्टी तीव्र निषेध व्यक्त करत आहे त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अन्यथा आंदोलन ,उपोषण महाराष्ट्र भर करन्याचे निवेदन भोकर पोलिसांना दिले आहे त्याबद्दल चौकशी करून गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आमची आहे असे ते बोलले आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...