Sunday, August 4, 2019

लोकसभेच्या पराभवानंतर भोसीकर यांचा भोकर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मंजूर

लोकसभेच्या पराभवानंतर भोसीकर यांचा भोकर तालुका अध्यक्ष  पदाचा राजीनामा अखेर मंजूर





भोकर:-(एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी लोकसभा निवडणुकी नंतर त्यांच्या तालुकाअध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी काल तो मंजूर केला आहे.
     मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याचे आरोप सुद्धा सामाजिक कार्यकर्ता एक मुस्लिम कार्यकर्ता शमीम इनामदार यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून भोकर पोलिसात  त्यावेळी अर्ज केला होता म्हणून त्यांच्या बद्दल अनेक चर्चेला उत शहरात पसरले होते त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वर त्यानी राजीनामा द्यावा ह्या साठी सुद्धा पोस्ट केले होते.त्यावेळी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष   राजीनामा मागितला न्हवता पण अशा पडसादाने मुस्लिम मत लोकसभा उमेदवार एकवटू शकला नाही त्याच्या मुळे अशोक चव्हाण यांचा दारुण पराभव झाला त्या पराभवाला लक्षात घेऊन अनेक काँग्रेस चे दिगग्ज कार्यकर्ते आपले राजीनामे दिले होते त्यानंतर अनेक दिवसांनी भोकर शहरातील जगदीश भोसीकर यांचा राजीनामा मंजूर झाला पण हा राजीनामा काँग्रेस च्या लोकसभा पराभवाचा नसून जगदीश पाटील यांच्यावर त्या वक्तत्यावरून नाराज असलेल्या मुस्लिम समाजाची मते एकवटण्यासाठी आहे अशी चर्चा शहरात सध्या विरोधी पार्टी कडून जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...