Tuesday, August 6, 2019

नांदेड मध्ये दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बॅगमुळे बॉम्ब असल्याचे अफवेह ने काही काळ भीतीचे वातावरण

नांदेड मध्ये दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बॅगमुळे बॉम्ब असल्याचे अफवेह ने काही काळ भीतीचे वातावरण




सोशल मीडियावर अफवेहला उत


‘खोदा पहाड निकला चुहा


नांदेड| प्रतिनिधी
 वर्कशॉप कॉर्नर जवळ असलेल्या यादव कॉम्प्लेक्स समोर एका दुचाकी गाडीवर सापडलेल्या दोन अज्ञात बँग्समुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने त्यांची तपासणी केल्या नंतर 'खोदा पहाड निकला चुहा’ अशी परिस्थिती झाली.पोलिसांसह जनतेने सुद्धा सुटकेचा सुस्कारा सोडला.



यादव कॉम्प्लेक्स समोर एका दुचाकीवर दोन बँग्स ठेवलेल्या होत्या.दुचाकीस्वार आला तेव्हा त्या बँग्स आपल्या आहेत असे म्हणणारा कोणीच तेथे नव्हता.मग मात्र दुचाकीस्वाराची गाळण उडाली. त्याने याबाबतची माहिती भाग्यनगर पोलिसांना दिली.त्यांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले तेव्हा पोलीस निरीक्षक मधुसूदन अंकुशे,पोलीस उप निरीक्षक सानप,संगीता कदम,अनेक पोलीस कर्मचारी यांचा ताफा तेथे पोहचला.धातू परीक्षक आणि स्वान यांच्या साहाय्याने त्या दोन बॅग्सची तपासणी केली तेव्हा त्यात एका बॅग मध्ये कागदपत्रे आणि एका बॅग मध्ये कपडे सापडले.बॅग मधील कागदपत्रांच्या आधारे त्याबग्स तेलंगणा राज्यातील माणसाच्या असाव्यात असा अंदाज आहे. बॅग तपासणी झाली तेव्हा यापरिसरात मोठी गर्दी जमली होती.दुचाकीस्वाराने सुद्धा आपल्याला आलेली शंका पोलिसांना सांगितली.पोलीस विभागाने अत्यंत जलदगतीने प्रतिसाद दिला आणि तपासणी केली.अशीच दक्षता सर्व नागरिकांनी बाळगावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले आहे.जमलेल्या गर्दी मधून खूप जणांनी त्याची व्हिडिओ चित्री करणं करून सोशल मीडियावर पाठवून अफवाह करत आहेत अशी अफवाह पसरू नये अशे निर्देश पोलीस विभागाने जारी केले आहे.  तसेच आज सकाळ पर्यंततरी त्या दोन बॅग्सचा कोणी मालक पोलीसांपर्यन्त आला नव्हता. सध्या त्या दोन बॅग भाग्यनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...