पॅनकार्डमध्ये होणार हे सहा बदल.
आर्थिक व्यवहारांसाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणार्या पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 5 डिसेंबरपासून पॅनकार्डसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅनकार्डमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
पॅनकार्डवर वडिलांचे नाव लिहिणे अनिवार्य असणार नाही. या अगोदर वडिलांचे नाव बंधनकारक होते. मात्र, यापुढे पॅनकार्डसाठी अर्ज करताना वडिलांचे नाव लिहिण्याची अट प्राप्तीकर विभागाने रद्द केली आहे.
आर्थिक वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणार्यांकडे पॅनकार्ड नंबर असणे अनिवार्य असणार आहे.
आर्थिक वर्षात 2.5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणार्यांसाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. मात्र यासाठी 31 मे 2019 पूर्वी पॅनकार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
आई एकमेव पालक (सिंगल पॅरेंट) असलेल्या अर्जदारांसाठी सुधारीत नियम दिलासादायक आहेत. या अर्जदारांना फक्त आईचे नाव पॅनकार्डवर लावण्याची इच्छा असल्यास तसा पर्याय ते निवडू शकतात.
करचोरी थांबवण्यासाठी आणि काळा पैसा नियंत्रित करण्यासाठी हे नियम नक्कीच फायदेशीर ठरतील.
घरगुती कंपन्यांना देखील पॅनकार्ड आवश्यक असणार आहे. या कंपन्यांची आर्थिक वर्षात होणारी विक्री, उलाढाल 5 लाखांपेक्षा कमी असली तरी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

No comments:
Post a Comment