परभणीत वसतीगृहामध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या.
File Photo
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत छताच्या पंख्याला फेट्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रात्री ९. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रीष्म मुलांच्या वसतिगृहातील खोली क्र. ६६ मध्ये ही घटना घडली. याबाबत पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सचिन पंडीतराव मुंढे (वय २०वर्षे, रा.सावरगावमुंढे, ता.लोणार, जि.बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री ९. ४५ वाजता वसतिगृहात तो राहत असलेल्या खोली क्रमांक ६६ मध्ये सचिन छताच्या पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्याचे खोलीत राहणार्या गणेश हनुमंत कापावार याने सांगितले. इतर मुलांच्या मदतीने त्यास खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती गणेश कापावार याने नवामोंढा पोलिस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन हा कृषी महाविद्यालयात बी.एस्सी.कृषी तृतीय वर्षात शिकत होता. पदवीच्या सलग तिन्ही सेमीस्टरमध्ये तो नापास झाला होता. परंतु याची कल्पना त्याने कुटूंबियांना दिली नव्हती. शिवाय शुल्क भरण्यासाठी कुटुंबियांकडून घेतलेले पैसेही त्याने खर्च करुन टाकले. त्यामुळे त्यास शुल्क भरण्याकरीता पैसे नव्हते. शुल्क भरण्याची मुदतही संपली असल्याने तो मानसिक तणावात आला असावा. घरचे काय म्हणतील आणि शुल्क कसे भरणार या तणावात असलेला सचिन वसतिगृहात राहण्यासही पात्र ठरणार नव्हता अशी माहिती आहे. त्यामुळे अधिकच तणावात येवून त्याने गळफास घेतला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू हे करीत आहेत.

No comments:
Post a Comment