राम जन्मभूमी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता यांच्या वर गुन्हा दाखल करा. - ईलियास कुरेशी
बेधडक महाराष्ट्र online न्युज
प्रतिनिधी (एजास कुरेशी)
भोकर : राम जन्मभूमी चित्रपटाच्या ट्रेलर मधून इस्लाम धर्मा विषयी चुकीची माहिती दाखवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामूळे नुरानी मस्जिद चिखलवाडी भोकर चे सदर मोहम्मद इलीयास मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांनी एडव्होकेट मोहम्मद अजीम एडव्होकेट अल्तमश एडव्होकेट मुजाहेद, सुलतान, आखीब, शाह व एडव्होकेट मोहम्मद सलीम यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन भोकर येथे सदरील चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक व लेखक यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे
इस्लाम धर्म येण्यापूर्वी समाजमध्ये स्त्रियांची खूप वाईट अवस्था होती जर मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत पुरले जायचे त्या काळातील माणसे मुलींना मालमत्ते मध्ये कसल्याही प्रकार चा हक्क देत नव्हतें स्त्रियांना केवळ उपभोगाचे साधन म्हणून वापरायचे व एकेक माणूस पन्नास पन्नास ते शंभर शंभर महिला सोबत लग्न करत होते परंतु जेव्हा इस्लाम धर्म उदयास आला इस्लाम धर्माने महिलांना सन्मानाने जगण्याची एक नवी दिशा दाखवली इस्लाम धर्म हा जगातिल पहिला धर्म आहे ज्यानें स्त्रियांना मालमत्तेमध्ये अधिकार सर्वात प्रथम दिले इस्लाम धर्म असे सांगतो की ज्यांना चार मुली आहेत व त्यानें त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांचा योग्य त्या वेक्तीशी विवाह लावून दिल्यास तो स्वर्गात जाण्याचा हकदार आहे व तसेच इस्लाम धर्माने जगाला तलाक ची कल्पना सर्वात प्रथम दिली इस्लाम धर्मापूर्वी तलाकची कल्पना जगाला नव्हती तलाक या साठी आहे की जर पती पत्नीचे आपापसात जमत नसेल तर ते त्यांच्या स्वखुशीने व त्यांचे भविष्यातील जीवन चांगले जगण्यासाठी ते तलाक देऊन वेगळे होऊ शकतात व आपले जीवन स्वखुशीने जगू शकतात .
पण राम जन्मभूमी चित्रपटा मध्ये इस्लाम धर्माची प्रतिमा मलिन करण्यासाठी व इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांवर खूप अत्याचार होतात असे खोटे राम जन्मभूमीच्या ट्रेलर मध्ये दाखवले आहे मुस्लिम बांधवांचा द्वेष निर्माण होत आहे त्यामुळे राम जन्मभूमी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता यांच्या वर लवकारात लवकर कार्यवाही करावी अशी तक्रार भोकर पोलीस स्टेशन येथे केली आहे या तक्रारी मुळे काय कारवाई होईल याकडे भोकरचे सर्व मुस्लिम बांधवाचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment