Friday, December 7, 2018

प्रेम केला जीवन जगण्या साठी पण केली दोघांनी गळफास घेवून आत्महत्या.

प्रेम केला जीवन जगण्या साठी पण केली दोघांनी गळफास घेवून आत्महत्या.


औंढा ना. (एजास कुरेशी) 
येथील वन विभागाच्या पर्यटन उद्यानाजवळ असलेल्या गोकर्णा माळावर एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली. सदरील घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त अशे की औंढा शहरा पासूनच नजीकच असलेल्या गोकर्णाच्या माळावर आज सकाळी स्थानिक गुराखी गवत घेण्यासाठी गेले असता, त्यांना दुर्गंधी जाणवत असल्याने आजूबाजूला पाहणी केली असता एकाच ठिकाणी झाडाच्या फांदीला दोन प्रेत लटकलेले आढळले, सदर घटना त्यांनी वन विभागाला कळविले नंतर वनपाल एस. एस चव्हाण यांनी औंढा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांसह औंढा व हट्टा पोलीस घटना स्थळी दाखल झाले. 

प्रेमी युगलाने त्या ठिकाणी झाडाच्या फांदीला ओढणीचे दोनभाग करून दोघांनी गळफास घेतला. झाडाखाली विषाची व पाण्याची रिकामी बाटली आढळल्यामुळे प्रथम विष प्राशन करून नंतर गळफास घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

प्रेत कुजून दुर्गंधी पसरल्यामुळे ४ ते ५ दिवसांपूर्वीच प्रेमयुगलाने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. 

तरुणीचे शाळेचे दप्तर व ओळखपत्र घटनास्थळी सापडल्यामुळे लगेच मुलीची ओळख पटली.सदर तरुणी औंढा तालुक्यातील दरेगाव येथील ध्रुपता कुंडलिक निंबाळकर वय १८ वर्ष असून येथील नागनाथ विद्यालयात १२ वि वर्गात शिक्षण घेत होती, दिनांक १ डिसेंम्बर रोजी शनिवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली व त्यानंतर ती घरी परतली नाही. वडिलांनी तिचा शोध घेवूनही ती सापडत नव्हती, आज तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर १९ वर्षीय मयत तरुण गजानन कुरुडे हा औंढा तालुक्यातील गावलेवाडी येथील रहिवासी होता, वडील विठ्ठल कुरुडे यांनी मयत हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले.औंढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सय्यद आजम,पोलीस निरीक्षक राहुल तायडे,जमादार अफसर पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला 

या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक मोरे,डॉ.गजानन वाशीमकर यांनी होते.दोघांचेही प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन केले या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...