Thursday, February 28, 2019

बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम संपन्न

बिलोली येथील ग्रामीण  रुग्णालयात प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम संपन्न 






बिलोली प्रतिनिधी (ए. जी.कुरेशी)
  दिव्यांग व्यक्ती अस्मिता  अभियान
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड च्या वतीने श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय नांदेड व पंचायत समिती बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना (UDID)
प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम ग्रामीण  रुग्णालय बिलोली येथे संपन्न झाला
कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर पुलवामा येथे शहिद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली
सदर कार्यक्रम मध्ये तालुका समतादुत शेख इर्शाद मौलाना यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,अपंग व्यक्तींना कागदपत्राची एका पेक्षा जास्त प्रतिलिपी तयार करणे ,राखून ठेवणे आणि एका पेक्षा जास्त कागदपत्रे घेण्याची आवश्यकता नाही कारण वाचकांच्या मदतीने कार्ड डिकोड केले जाऊ शकणारे सर्व आवश्यक तपशील कॕप्चर करेल .यूडीआयडी कार्ड भविष्यातील विविध फायदे मिळविण्यासाठी ओळख पटवण्याच्या एकमेव दस्तऐवज .
अपंगाचे सत्यापन असलेले यूडिआयडी कार्ड अमलबजावणीच्या सर्व स्तरावर लाभार्थींच्या शारिरीक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यास मदत करेल .यासाठी सर्व बिलोली तालुक्यातील अपंग बांधवांनी याचा लाभ घ्यावा .



सदर कार्यक्रम चे तालुका समन्वयक सय्यद एल.एच.(मु.अ.)मूकबधिर विद्यालय बिलोली व समाज कल्याण विभाग जि.प.नांदेड चे वेलूरकर धनंजय , नामदेव वाघमारे, दिपक कदम यांनी काम पाहिले .व .बजाज (सहाय्यक गट विकास अधिकारी बिलोली )  डाॕ.तोटावार (ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी ) तसेच मूकबधिर विद्यालयाचे सहशिक्षक आनंद पाटील बिराजदार ,शिवाजी माने ,रमेश हंबर्डे बालाजी ठक्करवाड , आनंदा अस्थिव्यंग शाळेचे मु.अ. कांबळे व मतिमंद शाळेचे मु.अ. भागेपल्ले यांनी या कार्यक्रम मध्ये नोंदणी करण्याचे व कागदपत्रे पडताळणीचे काम पाहिले व या कामासाठी एकूण ०४ टेबल लावण्यातआले ०१) मूकबधिर ०२)अस्थिव्यंग ०३)मतिमंद ०४)अंध अशी व्यवस्था करण्यात आली
सदर कार्यक्रम साठी पंचायत समिती बिलोली चे सभापती दत्तराम बोधने यांनी सहकार्य केले तसेच सदर कार्यक्रम साठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंचनवार यांनी सर्व दिव्यांगासाठी  अल्पोपहार (नाश्ता)दिले तसेच अपंग संघटनेचे बिलोली तालुकाध्यक्ष  सागर नरोड व सामाजिक कार्येकर्ते  शाहेद पटेल यांनी सर्व दिव्यांगाना कागदपत्र विषयी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रम चे सूत्रसंचलन  शिवाजी माने यांनी तर आभार आनंद बिराजदार यांनी मानले

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...