माणुसकी अजून संपलेली नाही,
भेटलेला मोबाईल पोलीस निरीक्षकच्या समक्ष परत.
भोकर :-(एजास कुरेशी)
रेल्वे गेट जवळ अगदी दाट वस्ती आहे तेथे एक सॅमसंग कंपनीचा मोठ्या किंमतीचा मोबाइल एका तरुण स्टील फर्निचर वर्कर च्या निदर्शनास आला तो मोबाईल तो हातात घेऊन पाहतो तर तो स्वीच ऑफ (बंद) होता.म्हणून त्यावर संपर्क झाला नाही तो उघडताच मोबाइल मालक फोन केला त्या वेळी भोकर येथील मो.फयाज यांनी त्यांना भोकर पोलीस स्टेशन मध्ये येऊन घेऊन जाण्यास सांगितले त्या मोबाईल मध्ये अनेक कामाची फोटो असल्याने ते वापस मिळालेला मोबाइल मोबाईल धारकाच्या मित्रा जवळ देण्यात आला भोकर येथील रेल्वे गेट जवळ एक सॅमसंग कंपनीचा जे 7 मॅक्स मोबाईल मो.फयाझ यांना मिळाला होता तो मोबाईल नाशिक येथे वीज वितरण कंपनी मध्ये काम करणाऱ्या साबळे यांचा होता मो.फोन वर बोलून साबळे यांना मोबाईल परत करेन तुम्ही या असे सांगितले पण साबळे हे नाशिक मध्ये राहत असल्याने त्यांनी भोकर च्या एका मित्रा ला फोन घेण्यास सांगितले व त्यांना भोकर पोलिस स्टेशन मध्ये बोलावून पोलीस निरीक्षक पडवळ याचा समक्ष मोबाईल परत करण्यात आला आहे मो. फयाझ यांचा खुप कौतुक करण्यात आला आहे.
भोकर मध्ये या अगोदर ही कावळे नावाच्या युवकाने देखील मिळालेले पैसे पोलीस निरीक्षक यांच्या कडे दिले होते.

No comments:
Post a Comment