शिवसेनेचा टायगर जिंदा नाही तर टायगर लाचार झाला - अशोक चव्हाण
नांदेड येथे महाअघाड़ीची पहिली जाहिर सभा संपन्न
नांदेड़ (एजास कुरेशी)
शिवसेनेचा टायगर जिंदा नाही तर टायगर लाचार झाला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी नांदेड येथून झाला आहे़ यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला मोठी उपस्थिती लावण्याचे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले होते
या महायुतीच्या सभेला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, आ़ डी़ पी़ सावंत आ.अमिता चव्हाण,आ. अमर राजूरकर यांची उपस्थिती होती शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली सभेला जवळपास २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी अनेक काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी सभा ऐकण्यास गर्दी केली.सर्व मान्यवरांचे भाषण झाले त्यावर मोदी सरकार व देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना यांच्यावर टीकेची झोड सुरू होती
भाजप सरकारनं नोटाबंदी केली मात्र 99 टक्के रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या त्यामुळं काळा पैसा कुठे गेला?, असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.
भाजपसोबत आम्ही कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. युती गेली चुलीत. अशा घोषणा करणाऱ्या शिवसेनेचा स्वाभिमान कुठे गेला असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी या सभेत शिवसेनेला विचारला आहे.
महाआघाडीला सत्ता द्या राज्यात चमत्कार करू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment