शेख युसूफ भाई ने शाहिद जवानांच्या कुटूंबियांना केली 50 हजारांची मदत
बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भोकर (एजास कुरेशी)
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सेलिब्रिटी ते अगदी सामान्य माणूस सर्वच जण या संदर्भात आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. यात भोकरचे सामाजिक कार्यकर्ते तथा उपनगराध्यक्ष प्रतिनिधी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपला वाढदिवस साजरा न करता त्यात होणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे वीर सुपूत्र शहीद संजय राजपूत व नितिन राठोड यांच्या कुटूंबीयांसाठी प्रत्येकी २५ हजार असे एकूण ५० हजार रुपये दिले असून ती रक्कम भोकरचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे
ते सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. आम्ही आमच्या जवानांच्या कुटुंबीयांची सदैव मदतीसाठी तयार आहोत आणि यापुढेही कायम सहकार्य करू’, असे यावेळी युसुफ भाई म्हणाले.
यावेळी शेख युसूफ भाई व शिष्ठमंडळतील सामाजिक कार्यकर्ते मौलाना मुबीन खान इनामदार, बाबा खान पठाण,हमीद खान पठाण,संपादक उत्तम बाबळे, पत्रकार एल.ए.हिरे,नगरसेवक शेख वकील खैराती,खाजा तौफिक इनामदार, माजी नगरसेवक जवाजोद्दीन बरबडेकर,महंमद ताजोद्दीन,बाबूभाई तामसेकर,इर्शाद खान पठाण यासह आदी जणांची उपस्थिती होती.यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी शेख युसूफ भाई मित्रमंडळ व मुस्लीम समाज बांधवांंनी वाढदिवस टाळून शहीदांना मदत करून श्रद्धांजली वाहिली असल्याने या उपक्रमाचे कौतुक केले असून प्रत्येकांनी देश रक्षणकर्त्या वीर जवानांप्रती ही भावना जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment