Sunday, February 24, 2019

पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ ची भोकरहून बदली

पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ ची भोकरहून बदली





भोकर:-(एजास कुरेशी)
 आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ हे भोकर पोलीस निरीक्षक पदभार ऑगस्ट २०१७ पासून स्वीकारला होता तेव्हा ते केवळ १८ महिन्याच्या आतच बदली प्रक्रियेत आल्याने शहरात एक आगळी वेगळी चर्चा सुरू झाली आहे.रामा सदाशिव पडवळ हे पदभार स्वीकारल्या पासून काही महिन्यातच मटका व गुटखा खुलेआम सुरू झाला होता कित्येक वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या होत्या पन काही केल्या मटका व गुटखा गब्बराण्णा  कोणाचाच धाक नव्हता म्हणून काही प्रमाणात  चर्चेला उत आला आहे त्यांची बदली लवकरच होणार असल्याचे देखील चर्चा अधिकारी वर्गात रंगली होती.
   पण ऐन लोकसभेच्या तोंडावर आर एस पडवळ यांची बदली केल्याने भोकर शहरात चर्चेला उत आला आहे कारण अवैध  मटका,अवैध गुटखा यासारखे धंदे थांबवण्यात अपयशी ठरलेले भोकर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची ओळख ठरली आहे ह्या बद्दल पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दखल घेऊन बदली प्रक्रिया केली असावी अशी देखील तूर्तास चर्चा सुरू आहे.
या पोलीस निरीक्षकाची पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे बदली झाली आहे ते लवकरच भोकर येथील पदभार सोडून नांदेड ला रवाना होणार असल्याचे समजले आहे.
येणारे नवीन पोलीस निरीक्षक हे तरी अवैध धंदे ,मटका व गुटखा  बंद करतील का या कडे भोकर शहरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...