देशावर संकट आले असताना ;कुंडलवाडी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी सुरेखा पुणेकर ला नाचवले.
File photo
नांदेड :-(ए.एम.कुरेशी)
नगरपरिषदेच्या प्रशासन विरुद्ध स्थानिक नागरिक व देश प्रेमी नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नुकतेच काही दिवसापुर्वी जम्मुकाश्मीर येथिल पुलवामा येथे लष्करी जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला यात जवळपास ४० जवान शहीद झाले तर दि १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी आपल्या लष्करांसोबत चकमक केली यामध्ये सलग दुसऱ्यांदा ४ जवान शहीद झाले या दोन्हीही घटनेत जवळपास ४४ जवान शहीद झाले यामुळे देशात शोककळा पसरून चिंतेचे वातावरण असताना नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथिल न पा प्रशासनाच्या सत्ताधा-यांनी आपल्या कारकिर्दीची दोन वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून सोमवार दि १८ फेब्रुवारी रोजी रात्री लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करून आपल्या सत्तेचे शहाणपण दाखवून दिले आहे यामुळे कुंडलवाडीच्या उपाध्यक्षाने विकासाची गाथा जनतेपुढे वाचवली; देशात शोककळा असताना सुरेखा पुणेकर नाचवली अशा चर्चा सोशलमिडीयावर करत या निंदनीय कृत्याचे स्थानिक परिसरातील व तालुक्यातील जनता तीव्र निषेध नोंदवत दिसून आली आहेत.दोन वर्षापुर्वी झालेल्या निवडणूकीत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला यामुळे आपल्या सत्तेची दोन वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून कुंडलवाडी नगर पालिकेच्या भाजपा सत्ताधा-यांनी आपण केलेली कामे जनतेला दाखवावी व नवीन विकास कामांचा शुभारंभ करावा यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी व्हावी या उद्देशाने सोमवार दि १८ फेब्रुवारी रोजी रात्री लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला होता. देशात शोककळा असताना असा कार्यक्रम आयोजन करून कुंडलवाडीच्या भाजपा सत्ताधा-यांनी शहीद जवानांच्या शोककळेचे भान विसरले असल्याचे दाखवून दिले. जरी हा कार्यक्रम नियोजित असला तरी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम सत्ताधा-यांना रद्द करता आला असता; मात्र आपल्या कार्यक्रमास जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही या भित्तीपोटी केलेल्या या कृत्याचे सर्वस्तरातून निषेध केले जात आहे. आपल्या देशावर झालेल्या दहशतवादी हल्याने सर्व देश हादरला असताना सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा कार्यकर्ते यांनी केल्याने अजून जास्तच चर्चेला उत आला आहे.

No comments:
Post a Comment