आयएफए गोळ्या वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
भोकर( एजास कुरेशी)
तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सशक्त विद्यार्थी अभियान या उपक्रमांतर्गत,तालुक्यात दिनांक 25 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी स्थानिक पातळीवरील मान्यवरांच्या हस्ते , आयर्न व फॉलिक ऍसिडच्या' गोळ्याचे वाटप केले जाणार आहे.
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अशोक काकडे हे जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेतील व अंगनवाडीतील विद्यार्थ्यांना, मा लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ घातले जाणार आहेत. यासाठी आरोग्य ,महिला बालविकास व शिक्षण विभागाकडून याची योग्य ती तयारी करण्यात आली आहे.
सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत गोळ्या वाटपाचे अंगणवाडीत कार्यक्रम घेतले जाणार असून ११ ते ०१ या वेळेत मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासले जाणार असून,दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्याचे नियोजन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तालुक्याचे गट विकास अधिकारी जी.एल.रामोड गटशिक्षणाधिकारी डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन महिन्यापासून शाळास्तरावर लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहेत. दरम्यान सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम लोकचळवळ म्हणून समोर यावी यासाठी एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात स्थानिक पातळीवरील सरपंच,पोलीस पाटील, साहित्यिक,यशस्वी उद्योजक ,शेतकरी, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आयएफए गोळ्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही आयएफए गोळ्या दिल्या जाणार असून.. सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम लोक चळवळ म्हणून उभे राहावी यासाठी ग्रामपातळीवरील अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर पूर्वतयारी करत असताना दिसून येत आहेत.

No comments:
Post a Comment