राष्ट्रवादी-काँग्रेस मधून भाजपात घुसलेल्या अनेकांना घरवापसीचे वेध लागणार..!
नांदेड (बेधडक महाराष्ट्र विशेष)
जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीपूर्वी
अनेक काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची सत्ता आली पण ज्यांनी ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्न आता जनमानसात विचारला जात आहे. या सर्वांनी भाजपात घुसताना ’’आम्हाला मतदार संघात कामे करावयाची आहेत, मतदारसंघाचा विकास करावयाचा आहे असे, जनतेला सांगितले आहे. आता तर भाजपाची सत्ताच आलेली नाही, मग भाजपात गेलेले हे नवप्रवेशवाले नेते आपल्या मतदारसंघात विकास कामे कशी काय करतील? कोण यांना निधी देणार? हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. . अशी माणसे आम्ही जनतेच्या विकास कामांसाठी पक्ष सोडून भाजपात जात आहेत, असे म्हणत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याबाबत जनतेला सक्ती कोण करु शकतो ? तर राज्यभर अशा मंडळींना जनतेने धडा शिकविला आहे. आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीने ज्यांना -ज्यांना प्रचंड, महाप्रचंड दिले त्यांनीच स्वार्थासाठी पडत्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजपा जवळ केली, ही बाब जनतेला पटलेली नाही, राज्यभर ही मंडळी आज हास्यास्पद विषय झाली आहेत. सक्रीत तर भाजपा कार्यकर्त्यांनी गंमतच केली आहे. त्यांनी चक्क सोशल मिडीयावर पक्षात नव्याने घुसलेल्यांना आवाहन केले आहे, ’’जनतेची कामे करण्याचा बहाणा करुन तुम्ही ऐनवेळी भाजपात घुसलात, आता भाजपाचेच सरकार आलेले नाही, तुमची विकास कामे होणार नाहीत, नंतर दोष देण्यापेक्षा तुमची कामे जिकडे होणार असतील तिकडे आजच निघून जा’’ भाजपात घुसलेल्या संधीसाधूंची या पेक्षा अधिक दुसरी बेईज्जत काय असू शकते. ही सर्व मंडळी आज हास्याचा विषय झाली आहेत. बरं त्यांचे परतीचे दोरही कापले गेले आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादीत स्वगृही गेले तरी त्यांना पूर्वीचा मान राहिल काय? कुणीतरी घोषणाच केली होती, की भाजपात गेलेली मंडळी पुन्हा परत स्वगृही आली तरी त्यांना कार्यकर्त्यांच्या रांगेत बसावे लागेल ! यात चूकीचे काही आहे असे कुणी म्हणू शकणार नाही. परंतू महाराष्ट्राच्या घडामोडींनी एकूणच देशाच्या राजकारणात एक फार मोठा अंडर करंट सोडला आहेे. देशात ’’बिगर भाजपा वादास’’ सुरुवात झाली आहे. भाजपाने ज्या प्रकारे शतप्रतिशत भाजपा, काँग्रेस मुक्त भारत, विरोधकांचा उघड सफाया, मित्र पक्षांचा स्लो पॉयझनींग तत्वाने सफाया, ही निती अवलंबीली होती. त्यामुळे विरोधकांच्या व मित्रपक्षांच्या आस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब ’बिगर भाजपा’ वादाचे अंकुर उगवण्यास कारणीभूत झाली आहे. भाजपामुळे आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याची जाणीव भाजपातेत्तर सर्वच पक्षांना झाली आहे. त्यातून सर्वात प्रथम शिवसेना पक्ष सावरला आहे. अधिक काळ भाजपा सोबत राहिलो तर आपण संपून जावू, त्यापेक्षा काँग्रेस -राष्ट्रवादी परवडली. हा विचार सेनेने केला आणि बिगर भाजपा वादाच्या मोहिमेची मुहुर्तमेढ महाराष्ट्रापासून रोवली. हा अंडर करंट आता देशभर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हे सर्व होत असताना व देशात भाजपाचा प्रादेशिक राजकारणाचा शेअर 70 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यत घसरला असताना, भाजपामध्ये नव्याने घुसलेल्या या संधीसाधू काँग्रेसींचे लाईट लागले नसते तरच नवल होते. त्यातूनच राज्यात अनेकांच्या डोक्यात घरवापसीचे, स्वगृही परतण्याचे चक्र आतापासूनच सुरु झाले आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी होण्याआधीच एक घरवापसी झाली आहे. आता राज्यभरात भाजपात ताजे -ताजे घुसलेल्यांना पश्चात बुद्धी म्हणा, की पश्चातापाची अनुभुती म्हणा, अनेकांना घरवापसीचे वेध लागणार आहेत, ही बाब निश्चीत !

No comments:
Post a Comment