अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करणार- खासदार प्रताप पाटील चिखलीकर.
भोकर प्रतिनिधी:- एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे. तेंव्हा सर्व शेतकर्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत त्वरित मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असा आत्मविश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील हाळदा येथे अतिवृष्टी बाधित पिकांची बांधावर जाऊन पाहणी करताना शेतकऱ्यांना दिला.
त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, उपजिल्हाधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, कृषी अधिकारी विठ्ठल गीते आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शेतकऱ्यांना ते म्हणाले की या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. परंतु शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. सर्व शेतकऱ्यांना येत्या दोन-तीन दिवसात आर्थिक मदत मिळणार आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटींची तातडीची मदत शेतकऱ्यासाठी जाहीर केली आहे. ते कमी पडली तर अजून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वाढून मदत देणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे. आमचे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे मदतीसाठी तयार आहे असे अभिवचन दिले.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा काढलेल्या विम्याचीची झेरॉक्स प्रत व पिक नुकसानीचा अर्ज गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना द्यावा. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात खेटे मारू नये. सर्व कर्मचारी आपल्या गावात येऊन आपले पीक नुकसानीच्या अर्ज स्वीकारतील. असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केल्या.
यावेळी भोकर चे गटविकास अधिकारी रामोड, कृषी सहाय्यक, मंडळाधिकारी, तलाठी यांच्यासह गणपतराव पिटेवाड दिलीप सोनटकके संतोष मारकवार बाळासाहेब साखळकर गणेशराव कापसे गावातील शेतकरी दत्तराव आक्कलवाड, साईनाथ याटेवाड, बालाजी नार्लेवाड, बाबुराव नागमोड, सुरेश भोसले, श्याम खांडरे, चंद्रकांत नागमोड, संतोष बोईनवाड, संदीप किसवे, आनंद हेमके, गोविंद पन्नसवाड, बालाजी परेवार, पुंडलिक खांडरे, गंगाधर आक्कलवाड, सोपान सुकलवाड, शिवाजी भोसले, आदीसह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment