Sunday, November 3, 2019

*दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग*

दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग





 भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांत दिवाळीच्या सुट्टीत,दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जादाचे तासिका वर्ग घेऊन निकाल वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत..

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित केले असून गुणवत्तेत सुधारणा झाली पाहिजे यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन ते राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे  असा त्यांचा मानस आहे.

भोकर तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेले, एक मूल एक वृक्ष, वाचनासाठी एक तास, सशक्त बालक अभियान, असे विविध उपक्रम येथील गट शिक्षणाधिकारी डॉ . डी एस मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून  शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

दरम्यान दिवाळी सुट्टीचा सदुपयोग व्हावा, यातून जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि सोबतच निकालाचे प्रमाण वाढावे म्हणून जादा तासिका घेउन शिक्षकाकडून अध्यापन केले जात आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे  दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पासून अध्यापन कार्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमास विद्यार्थ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पालक गावकरी आदीसह सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात बदलाचे वारे वाहत असल्याने शिक्षण प्रेमी नागरिकाकडून शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे..

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...