भोकर मध्ये १६ फेब्रुवारी ला युवा पँथर आयोजित आंबेडकरी जलसा
भोकर (एजास कुरेशी ) येत्या १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी
भोकरच्या नूतन शाळेच्या मैदानावर युवा पॅंथर च्या वतीने
भव्य स्वरूपातील ‘आंबेडकरी जलसा’ आयोजित केला आहे.
दलित चळवळीच्या गाण्यांना मोठी परंपरा आहे. डॉ. आंबेडकरांचा लोकसंपर्क वाढत गेला तेव्हापासून ती आहे. बाबासाहेबांच्या भाषणाआधी लोकशाहिरांची गाणी, हा प्रघात १९४०च्या दशकातही होता. ‘एक गीत माझ्या दहा भाषणांपेक्षा अधिक परिणामकारक’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले, ते वामनदादा कर्डकांच्या गाण्यानंतर. हे वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप अशा थेट आंबेडकरी चळवळीतील कवी-शाहिरांनी ही परंपरा सशक्त केली होती.
क्रांतिवीर शहीद पोचीराम कांबळे शहीद गौतम वाघमारे या सारख्या अनेक आंबेडकरी वीर यांच्या क्रांतिकारक नामांतर लढ्यातून मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण विस्तार झाले त्या गौरवशाली लढ्याची ज्योत निरंतर प्रज्वलित रहावी यातून खऱ्या अर्थाने युवापिढी आंबेडकरी लढ्याची प्रेरणा मिळावी म्हणून भोकर येथील युवा पॅंथर या सामाजिक लढाऊ संघटनेकडून भव्य आंबेडकरी जलसा चे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एम सायलू म्हैसेकर तेलंगणा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल प्रधान संघटना प्रमुख युवा पॅंथर हे राहणार आहेत, सदरील कार्यक्रमासाठी नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड, बाली भाऊ कांबळे, प्राध्यापक जाधव, संजय घंटलवार, दिनेश लोंढे पाटणकर, राहुल चौदंते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी रविवारी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर सविधान मनोहरे अमरावती यांचा भीम गितांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकवाड यांनी दिली आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स संघदीप वारघडे, महेंद्र दुधारे, अंकुश चव्हाण, प्रकाश जाधव, प्रेम गायकवाड, विजय उर्फ पिल्लू दवणे हे प्रयत्न करत आहेत.

No comments:
Post a Comment