Sunday, June 16, 2019

ई.व्ही.एम. हटाव , देश बचाव बिलोली तहसिलवर घंटानाद आन्दोलन

 ई.व्ही.एम. हटाव , देश बचाव  बिलोली तहसिलवर घंटानाद आन्दोलन.



बिलोली प्रतिनिधी.
बहुजन महासंघ  वँचित आघाडी  लोकस्वराज आन्दोलन एम आय एम युवा पन्थर आदि पक्षाच्या वतिने  दिनाक १७ जुन रोजी सकाळी ११ वाजता  बिलोली तहसिल कार्यालयावर
ई.व्ही.एम. हटाव व देश बचाव च्या मागणी साठी घंटानाद आन्दोलन पुकारण्यात आले. अशी माहीती  वँचित आघाडी तालुका अशा ध्यक्षानी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या केली आहे.त्याना जाब विचारना करण्यासाठी आदरणीय सर्वांचे ष्रध्दास्थान व राष्टरीय नेते अड. प्रकाश आंबेडकर यानी महाराष्ट्र व देशात महत्वाचा मुध्दा गाजत आहे. तो ई. व्ही. एम. मशीन हटाव , देश बचाव या मागणीसाठी संबध महाराष्ट् बन्द चे आवाहन केले व जिल्हा  व तालुक्याचे ठिकाणी   ई.व्ही.एम. हटाव  साठी कार्यकर्ते नागरीकानी घंटानाद आन्दोलन करण्याचे आवाहन केले.

लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपले मुलभुत हक्क व मतदानाचा अधिकार डा. बाबासाहेब आंबेडकर यानी दिला आहे. गरीब असोकी ष्रिमंत असो सर्वाना समान न्याय समता बंधुत्व भाईचारा टिकवुन रहावा. देशाचे विकासात्मक धोरणे व संविधानाचा आदर केला पाहीजे.भारतात खरी लोकशाही नांदली पाहीजे.खरी लोकशाही जिवंत असावी.
सर्व तमाम जनता व नागरीकानी याकडे लक्ष देवुन आगामी विधानसभेची निवडणुक बलेट पेपर कागदावर व्हावी.
तसेच लोकसभेच्या ४८  मतदार संघात मतमोजणीत असलेली तफावत या संशयाला बळकटी देणारी आहे. जनतेला अंधारात ठेवुन दिशाभुल करुन कटकारस्थान करुन सत्ता  काबीज करण्याची चाल आहे.
ई.व्ही,एम. मशीन हटवुन विधानसभा निवडणुक  बलेट पेपर द्वारे करण्यात यावी. डा.बाबासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवणे हि काळाची गरज आहे. हे आवश्यक समजुन सर्व मतदार बँधु व नागरीकानी घंटानाद आन्दोलनात भाग घेण्याचे आवाहन बाळासाहेब आँबेडकर जिल्हा अध्यक्ष डा.संघरत्न कुर्हे  तालुका अध्यक्ष धम्मदिप गाँवडे  नगरसेवक अनुप अंकोशकर तालुका अध्यक्ष वलीयोदिन फारुखी एम आय एम चे ता. अध्यक्ष साजीद कुरेशी  एल पी गोणेकर बालाजी नरहरे शेषराव वाघमारे कांगठी  सुनिल नरहरे प्रा. धम्मपाल जाधव प्रकाश दुगाने सुरेश भुसावळे जयकुमार पोवाडे गणेश काँबळे आदि नी आवाहन केले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...