भोकर येथे रात्री झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी ठार व इतर चार जखमी
भोकर : (प्रतिनिधी )
भोकर उमरी रस्त्यावर भोकर पासून जवळच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरा समोर एक स्कूटी आणि ट्राली ऑटोच्या झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व तसेच चार जखमी झाले आहे.
उमरी कडून भोकरकडे येणारी एक विना नंबरची स्कूटी आणि भोकर कडून उमरी कडे जाणारा पिवळ्या रंगाचा मालवाहू ऑटो क्रमांक एम एच 26 AD 88 92 यांच्यात उमरी रोडवर, श्रीकृष्ण मंदिराजवळ दिनांक 26 जून रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान समोरासमोर भीषण धडक झाली, यात लामकानी येथील रहिवाशी असलेले तरुण पोलिस कर्मचारी श्री, राजू गणेश सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. राजू सूर्यवंशी हे नांदेड पोलीस दलात क्यू आर टी मध्ये सामील होते, अपघात झाल्याचे कळताच पोलीस कर्मचारी व आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी अपघातस्थळी धाव घेतली पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झालेला आहे.
मयत पोलीस जवान गंगाधर सुर्यवंशी यांच्या पश्चात आई, वडील,दोन भाऊ,पत्नी व मुलगा असा परिवार असून त्यांच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने पोलीस विभागासह कुटूंबीय व स्नेहीजणांत शोककळा पसरली आहे.तर सदरील भिषण अपघात प्रकरणी भोकर पो.नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार उमेश कारामुंगे,पो.कॉ.कृष्णा तलवारे हे करत आहेत.
तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

No comments:
Post a Comment