Saturday, June 29, 2019

साप्ताहिक काजीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करा पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी रेल्वेएक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा :-मा.नगरसेवक दिलीप सोनटक्के

साप्ताहिक काजीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करा पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी  रेल्वेएक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा :-मा.नगरसेवक दिलीप सोनटक्के




भोकर (एजास कुरेशी)
साप्ताहिक काझीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करून पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी,यारेल्वे एक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा असा विनंती अर्ज भोकर येथील माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिला आहे
भोकर येथे बाजार पेठ मोठे आहे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पटणा,कोल्हापूर,धनबाद, संत्रागाच्छी, या रेल्वे एक्सप्रेसला भोकर येथे थांबा देऊन साप्ताहिक काजीपेट आदीलाबाद-मुंबई ही रेल्वेगाडी भोकर तालुक्यातील जनतेसाठी वरदान आहे काजीपेट आदीलाबाद -मुंबई ही रेल्वे एक्सप्रेस भोकर ला सकाळी ५ वाजता आहे ती नांदेड ला ६ वाजता पोहचते तालुक्यातील गरीब विध्यार्थ्यांना नांदेड येथे राहून शिक्षण घेणे ज्यांना परवडत नाही असे विध्यार्थ्यांना काजीपेट, आदीलाबाद-मुंबई ही गाडी नियमित झाल्यास तालुक्यातील विध्यार्थ्यांना वर्दान ठरेल आणि नांदेड कडून भोकरकडे येणाऱ्या प्रवाश्यांना रात्रीला एक गाडी उपलब्ध होते म्हणून ही गाडी भोकर तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
तसेच पटणा, कोल्हापूर, धनबाद, संत्रागाच्छी, या गाड्यांना भोकर येथे थांब देऊन भोकर तालुक्याच्या प्रवाशांच्या प्रवासाची सोय करावी व तसेच भोकर रेल्वेस्टेशन ला खूप दिवसापासून कँटीन बंद आहे ती कॅन्टीन लवकर चालू करावी कोच इंडिकेशन बोर्ड व पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम चालू करावे व तसेच सफाई कामगार हाय मास्ट लाईट असे अनेक मागण्यांचे निवेदन खासदार प्रताप पाटील चिकलीकर व रेल्वेचे महाव्यवस्थापक सिकंदराबाद, रेल्वे अध्यक्ष दिल्ली, डिआर एम नांदेड यांच्याकडे माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...