Tuesday, June 25, 2019

भोकर शहरात डोनेशन च्या नावाखाली होत आहे पालकाची लूट..

भोकर शहरात डोनेशन च्या नावाखाली होत आहे पालकाची लूट..

   

 प्रतिनिधी: एजास कुरेशी

भोकर शहरातील इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून, आता पालकांची गरज लक्षात घेऊन ऍडमिशनसाठी संस्थाचालक मनमानी पद्धतीने रक्कम उकळत आहेत म्हणून गोरगरिबांना हे शिक्षण महागाचे झाले आहे. एकीकडे शासन आठवीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे सांगतो आणि दुसरीकडे हे खाजगी संस्थाचालक हजारो रुपये डोनेशनच्या नावाखाली उकळून आपली तुंबळ भागत आहे.

  शहरातील व तालुक्यातील इग्रजी व मराठी माध्यमाच्या प्रसिद्ध शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धावपळ सुरु झाली आसुन, आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे व चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या करिता गुपचूप सस्थेच्या संबंधिताशी संपर्क साधुन वाटेल ते ‘डोनेशन’ देण्यात  येत आहे. काही पालक इंंग्रजी व सेमी इंग्रजी शाळामध्ये नर्सरीते पहीलीच्या वर्गा करिता प्रवेशासाठी चकरा मारत आहेत. काही नांमकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशा करिता वाढविलेल्या भरमसाठ ‘डोनेशन’ मुळे पालकांनी ‘धास्ती’ घेतली आहे. विशेष म्हणजे ‘शासनाने शाळांच्या ‘डोनेशन’ वाढीला कोणताही बंदी लावण्यात आलेली नाही. उलट मुलांच्या पालकांचा आधिकारांवरच गदा आणलेली आहे. या शाळानी ‘डोनेशन’ ची रक्कम वाढवुन मणमानी कारभार सुरु केल्यामुळे गोर – गरिबांना चांगले शिक्षण मिळाले दुरापास्त झाले आहे. अशी चर्चा काही वंचित आणि जागरूक पालकाच्या तोंडून ऐकवायास मिळत आहे. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे बघुन भरपुर काही खाजगी संस्थाचालक मनमानी डोनेशनची मागणी करत आहेत. आणि त्यातही विविध फंडाच्या नावे पालकाकडुन निधी उकळल्या जात आहे अशी ही चर्चा भोकर शहरा मध्ये सध्या तरी आयकण्यात मिळत आहे.

यावर्षी सुध्दा भोकर शहरात कार्यरत असलेल्या काही खाजगी संस्थाच्या शाळेनी डोनेशनचे दरच ठरविले असल्याचे विश्वासनिय माहीती आहे. ते ‘डोनेशन ‘नाही तर प्रवेश मिळणार नाही अशी भुमिका संस्थाचालकांची असल्याने अर्थिक परिस्थितीने ञस्त असलेल्या पालकांत माञ चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही ञस्त पालकांनी आपला रोष व्यक्त करताना सागितले की, शासनाने २०११ मध्ये शिक्षन शुल्क नियमन कायदा केला. परंतु त्या कायदाचा फायदा पालकांना नव्हे शाळा सस्था चालकांनाच होताना दिसत आहे. शासनाने हा कायदा रद्द करावा. आणि इंग्रजी शाळेतही आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद करून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येही इंग्रजी अभ्यास करांची सोया करून गोर – गरिबांच्या शिक्षणाची सोय करावी अशी रास्त मागणी पालक वर्गातुन होत आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...