Tuesday, June 4, 2019

लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.

लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.



(जाहिरात)



लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.
बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नांदेड :-
रान डुक्कराच्या हल्यात मृत्यू पावलेल्या लोहा तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या कुटूंबाला नवनिर्वाचित खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मंगळवारी 15 लक्ष रूपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात आले.

लोहा तालुक्यातील हिप्परगा (चितळी) येथील शेतकरी सुधाकर बापुराव खांडेकर यांच्या 22 फेब्रुवारी रोजी रान डुक्कराने केलेल्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुधाकर खांडेकर यांचे कुटूंब उघडयावर आले होते. तत्परतेने कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार तसेच नवर्विचित खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खांडेकर कुटूंबियांची भेट घेतली व तसेच त्यांना शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान मंजूर करावे अशा सुचना वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिल्याह होत्या. सुचना देवून एवढयावरच न थांबता खांडेकर कुटूंबियांची होरपळ थांबावी यासाठी जातीने लक्ष देत शासनाकडून 15 लाख रूपयाचा निधी मंजूर करून आणला. याच सानुग्रह अनुदानाचा धनादेश मृत्त शेतकरी सुधाकर खांडेकर यांच्या पत्नी संगीता खांडेकर, मुलगा माधव खांडेकर यास खा. चिखलीकरांच्या हस्ते मंगळवारी साईसुभाष या त्यांच्या निवासस्थानी देण्यात आला. यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डी.एस. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एन. ठाकूर, वनपरिमंडळ अधिकारी एस.एन. मुंडे, वनरक्षक एल.एन. शेळके यांची यावेळी उपस्थिती होती.

(जाहिरात)




























No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...