बिलोलीत रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छा
बिलोली (प्रतिनिधी)
महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर बुधवारी बिलोली शहर व तालूक्यात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजानईद) उत्हात सकाळी 8 : 30 नमाज पठणानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे.
सकाळी शहरातील जामा मस्जिद व ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही.
मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते़
सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना ख-या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना मौलाना आहेमद बेग यांनी केली
ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्या च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते. या वेळी जेष्ट ए.जी. कुरेशी, मुकरम फारुखी, वलीओद्दीन फारुखी , सय्यद रियाज, फहिम सेठ , साजिद कुरेशी ,जावेद कुरेशी, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, उपनगर अध्यक्ष मारोती पटाईत , सुलेमान शेख, मुज्जू बेग, साबेर पटेल , शौकत बेग, मनसूर भाई, बासीत सेठ, अत्तर भाई , यांच्या सह अनेकांनी ईदगाहवर भेटी दिले

No comments:
Post a Comment