भोकर तालूक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परचालका विरुध्द भोकर पोलिसात गून्हा दाखल
भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यात अवैध रेती दररोज चोरट्या रेतीची वाहतूक होत असते. त्यामुळे महसूल प्रशासनाने एकदा कारवाई केली तरी ती सातत्याने व्हायला हवी, असे सर्वसामान्य नागरिकात चर्चा होत आहे. महिन्यातून एक-दोनदा दिखाऊ कारवाई करायची व त्यानंतर रोजचे दहा वीस चोरट्या रेतीचे ट्रक दिवसाढवळ्या भोकर शहरातून किनवट रोड ने बाहेर गावी जाता असतात हे या लोकांना दिसत का नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन दक्ष नसल्यानेच इतक्या प्रमाणात चोरटी रेती शासनाचा मोठा महसूल बुडवून वाहतूक करतात.
अमर्याद रेतीउपसा होत असल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. प्रत्यक्षात ज्यांनी कारवाई करायची आहे ते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने ते 'मालामाल' झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात रेतीघाट बंद असताना सुद्धा मुदखेड ते भोकर मार्गाने रेतीची वाहतूक करणार्या एका टिप्परचालकाविरुध्द भोकर पोलिलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक माहिती अशी की, दि.२३ जूलै रोजी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी आपल्या शासकिय वाहनाने मूदखेडकडे जात असताना समोरुन अनाधिकृत गौनखनिज रेतीची वाहतूक करीत असलेला टिप्पर क्र.एम.एच.२६ ए.डी.९९०२ येत असल्याचे त्यांना दिसताच गाडी थांबवून टिप्परचालकास विचारणा केली.
जिल्ह्यात रेतीघाट बंद असताना रेती आणली कूठून असा प्रश्न केल्यावर जूनी पावती टिप्परचालकाने दाखवली तीन ब्रास रेती अंदाजे किंमत १२००० असल्याचे निदर्शनास आल्यावर टिप्पर तहसीलमध्ये लावण्यात आला असून.दि.२४ रोजी मंडळअधिकारी महेश वाकडे यांच्या फिर्यादीवरीन टिप्परचालक तूकाराम लक्ष्मण मूतकलवाड यांच्याविरुध्द महाराष्ट्र जमिन अधिनियम १९६६ ४८(७)४८(८) भादवि३६९ प्रमाणे गून्हा नोंदविण्यात आला आहे.
गेली अनेक दिवसापासून जिल्ह्यातील रेतीघाट बंद असताना गौनखनिज रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे चढ्या दराने रेतीची भोकर शहरात व तालूक्यात विक्रि होत आहे.मध्यरात्री हा व्यवसाय जोमात चालत असल्याची चर्चा होत आहे.महसूल विभाग या अनाधिकृत रेती वाहतूकीकडे अक्षम्य दूर्लक्ष करीत आहे.एकीकडे तालूक्यातील असंख्य घरकूल लाभार्थ्यांचे रेतीअभावी घरकूलाचे बांधकाम रखडले असताना रेतीची वाहतूक कशी होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.अव्वाच्या सव्वा दराने विकून रेतीतस्कर आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत महसुल प्रशासनाने अशा गौनखनिज रेती,मूरुम,दगड,अनाधिकृत वाहतूक करणार्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

No comments:
Post a Comment