भोकरच्या त्या दुहेरी खून खटल्यात एकाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप
आज च्या निकालाकडे संपूर्ण भोकर तालुक्याची उत्सुकतेने नझर होती
दिगंबर दासरे........ मोहन दासरे
भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यात दोषी असणाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात अली असून एकाला फाशीची शिक्षा तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या बाबत माहिती अशी की आरोपी नामे दिगंबर बाबुराव दासरे व मोहन नागोराव दासरे यांनी त्यांची सख्खी बहीण नामे पूजा ही दिनांक २३ जुलै २०१७ रोजी ती इतर समाजाच्या व त्यांच्याच गावातील मुलगा गोविंद कऱ्हाळे सोबत पळून गेली. तेलंगणामध्ये एका गावात राहून दोघे प्रियकर आणि प्रियेसी आपल्या जीवनाचा गाडा पुढे चालवत होते. तेव्हा दिगंबर दासरेला याबद्दलची माहिती प्राप्त झाली की ते दोघे तेलंगणा राज्यातील गाव खरपाडा मंडळ मुधोळ येथे राहत आहेत. आपल्या बहिणीने समाजात आपली बेइज्जती केली म्हणून तो राग धरून दिगंबरने एका दिवशी आपल्या चुलत बंधू मोहन नागोराव दासरेला सोबत घेऊन खरबाडा येथून येऊन दोन दुचाक्या भोकर तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या दिवसी (बु.) व निवघा परिसरातील एका नाल्याजवळ आल्यानंतर थांबविल्या आणि तेथे दिगंबर दासरेने आपला मनातील राग व्यक्त करताना विळ्याने आपला मित्र आणि बहिणीचा प्रियकर गोविंद विठ्ठल कऱ्हाळे याचा गळा कापून टाकला. प्रियकरावर होणारा हल्ला पुजाला सहन झाला नाही. ती मध्ये आली असताना दिगंबरने तिच्यावर सुद्धा विळ्याने अनेक वार करून तिची हत्या केली. रक्ताने माखलेला विळा घेऊन दिगंबर बापुराव दासरे पोलिस ठाणे भोकर येथे हजर झाला. भोकर पोलिसांनी दिगंबर बापुरास दासरे आणि त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे या दोघांविरूद्ध भादवीच्या कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक सुशिल चव्हाण आणि पोलिस हवालदार नामदेव जाधव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दिगंबर दासरे आणि मोहन दासरेविरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. १८ जुलै २०१९ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग 1 न्यायाधीश श्री एम एस शेख यांच्या न्यायालयात ह्या दोन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले असून दिगंबर बाबुराव दासरे, याला फाशी व मोहन नागोराव दासरे, याला जन्मठेप सुनावण्यात अली आहे
या खटल्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवून घेतल्या. उपलब्ध झालेल्या पुराव्याआधारे न्या. शेख मुजीब यांनी खून प्रकरणी दोघांना दोषी मानले. पण प्रत्यक्षात घटना घडताना दिगंबर बापूराव दासरे याने केलेली वेगवेगळी कृती अत्यंत भयंकर मानली गेली आणि त्या आधारावर न्या. शेख मुजीब यांनी दिगंबर बापूराव दासरेला दुहेरी खून खटल्यात फाशी आणि पाच हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. खून प्रकरणात त्याला साथ देणारा त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरेला जन्मठेप आणि ११ हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. रमेश राजूरकर यांनी काम केले तर आरोपींच्यावतीने ऍड. मोहन जाधव यांनी त्यांची बाजू मांडली. आपण दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे सविस्तर विवेचन करताना न्या. शेख मुजीब यांनी समाजात आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा खुनांच्या घटना वाढत आहेत. त्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने अशा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवाडे दिले आहेत. म्हणूनच दिगंबर दासरेला फाशीची शिक्षा देत आहे. फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केल्यावर पुर्णत्वाकडे जात असते. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती, त्यावेळी भोकरचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले, सोपान थोरवे यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची चोख बंदोबस्त राखला होता.

No comments:
Post a Comment