स्पोर्टस असोसिएशन शाखा भोकर तर्फे खेळाडूंना ग्रेड बेल्ट वितरण सोहळा व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
भोकर :- (एजास कुरेशी)
शहरातील विमल इंग्लिश स्कूल येथे नांदेड जिल्हा स्पोर्टस असोसिएशन शाखा भोकर तर्फे खेळाडूंना ग्रेड बेल्ट वितरण सोहळा व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल इंग्लिश स्कूलचे सचिव डॉ. राम नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, उपाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, सचिव सिद्धार्थ जाधव, सल्लागार बी.एस. सरोदेसर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कराटे स्ट्रोक, ग्रुप डेमो काता, सेल्फ डिफेन्स आदी खेळांची विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध बेल्टचे व प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील छोटा धावपटू ईशांत हनुमंत बारसे यांचा सर्वाकडून सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी भोकर तालुका मराठी मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे आयोजकांकडून यथोचित सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमास विमल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य लखन जाधव, प्रशिक्षक घुगे सर, कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर, पत्रकार कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे, शेख शाहरुख, संजय नाईकडे, विद्यार्थ्यांचे आई-वडील व विद्यार्थी- विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment