Thursday, April 2, 2020

कोरोनामुळे शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्याने मराठवाड्यातील उर्वरित कापसाचे काय होणार...?

कोरोनामुळे शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्याने
मराठवाड्यातील उर्वरित कापसाचे काय होणार...?



विश्वनाथ शिंदे मांजरमकर
"मराठवाड्यात कापुस हे प्रमुख नगदी पिक आहे.बहुतांश शेतकऱ्यांचं अर्थकारण त्यावरचं अवलंबुन आहे.मागील सलग ४ वर्ष पावसाने दगा दिल्याने पदरी दुष्काळ आला परिणामी उत्पन्न घटलं आणि झालेला खर्च हि नं आल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं.यंदाचं सालमान तसं बरं राहिलं मराठवाड्यात आवश्यतेएवढा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.खरिफासह रब्बी हंगामातील पिकांनी जोम बांधला आहे आणि बोंड अळी मुळे खूप अडचणीत आलेला शेतकरी
त्यातचं मागील पंधरवाड्यात देशासह जगभरात 'कोरोना' व्हायरस चे संकट ओढवल आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणुन संपुर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा केल्याने व्यवहार पुर्णतः बंद आहेत.त्यात कापुस पिकाचे जीवनचक्र खरिफा पासुन ६-८ महिन्यांचे असल्याने शेतकरी आर्थिक स्थितीनुसार साधारणतःफेब्रुवारी-मार्च पर्यंत कापुस विक्री करत असतो.




यंदा खाजगी व्यापाऱ्यांऐवजी सिसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मार्फत सुरु असलेल्या शासकीय खरेदी केंद्राकडुन कापुस खरेदी सुरू होती.या केंद्रावर प्रचंड गर्दी झाल्याने व व्यवस्थापन नसल्यानें शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं त्यामुळे सीसीआय केंद्रांकडे आठवडा भराच्या रांगा लागुनही खरेदी पुर्ण झाली नाही .जवळपास ५०% शेतकऱ्यांचा कापुस घरात आहे.शिवाय आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी व्यतिथ झाला आहे.कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर उर्वरीत कापुस खरेदी होणार का..? हा प्रश्न त्यांना त्रासदायक ठरत आहे.
कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी देशातील सर्व घटक एकजुटीने प्रशासनाला सहकार्य करत आहेत.येणाऱ्या काही दिवसात आपण हा कोरोना विरोधी लढा निश्चितच जिंकु हा विश्वास आहे. परंतु लॉक डाऊन मुळे आगामी काळात आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. याचा परिणामी देखील देशातील सर्व गोष्टीवर होणार आहे. याचा परिणाम वेळेत खरेदी झाली नसल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
तरीही माय-बाप सरकारला मी शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर कळकळीची विनंती करतो कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर शासकीय कापुस खरेदी केंद्र पुर्ववत होऊन शेतकऱ्यांकडील उर्वरित कापुस खरेदी पुर्ण होईल.अशा प्रकारच्या अधिसुचना शासनाने काढत कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या जगण्याला आधार द्यावा हि विनंती!

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...