मस्जिद कमेटी तर्फे क्वारंटाईनमधील नागरिकांच्या नाष्ट्याची व्यवस्था ,
जिंतूर प्रतिनिधी/
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने 14 दिवसासाठी क्वारंटाईन मध्ये ठेवलेले आहे.ह्या क्वारंटाईन मधील नागरिकांना शासन प्रशासन मदत करत असून सुद्धा या कार्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या नाष्ट्याची व्यवसथा करण्यात येत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना महामारीमुळे राज्यातील जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, या बंदीत जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवरच विचारपूस केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना थेट १४ दिवसासाठी क्वारंटाईन कक्षा मध्ये ठेवण्यात येत आहे ,त्या क्वारंटाईन मध्ये ठेवलेल्या नागरिकांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था शासनाकडून केली जात आहे तरीही जिंतूर शहरातील काली मस्जिद कमिटीच्या वतीने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष मसूद पठाण यांनी सांगितले आहे कमिटी चे अध्यक्ष मसूद पठाण यांच्या ममार्गदर्शनाखाली दिनांक.१७ एप्रिल शनिवार पासून दररोज सकाळी 8 वाजता क्वारंटाईनमधील नागरिकांना ते जिथे जिथे क्वारंटाईन केलेले आहे म्हणजे ,शासकीय रूग्णालय,पोलीस स्टेशनला, वसतिगृह आदी ठिकाणी जाऊन फळ,चिवडा,बिस्कीट,खारी सह वसतिगृह परिसरात जागेवरच गरमागरम चहा करून देण्यात येत आहे,सदर व्यवस्था हा जो पर्यंत क्वारंटाईनमध्ये नागरिक राहतील तो पर्यंत ही वयवस्था सुरूच राहणार असल्याची माहिती मसूद खान पठाण यांनी एका लेखी निवेदनासह तहसीलदार सुरेश शेजूळ यांना दिली असून तहसीलदारांनी कमिटीच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या या मदतकार्याची प्रशंसा करून अभिनंदन केले आहे या मदतीच्या उपक्रमसाठी शेख अखील,नवाज कुरेशी,शेख मुहम्मद ईलीयास,शेख अब्दुल बारी,रियाज खान उर्फ बब्बू भाई,साजीद ठेकीया,पञकार शेख अलीमसह कमेटीच्या सदस्य परिश्रम घेत आहे
अडचणीत असलेल्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढाकार घेतला तुम्ही पण घ्या ::= मसुद पठाण
सध्या कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे , त्यामुळे प्रत्यक समाजातील नागरिक जे रोजनदारीवर काम करणारे आणि रोज कमवून खाणारे रोजगार आहे बेरोजगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आल्याने ते हतबल झाले आहे म्हणून या सर्वांची काळजी घेऊन सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित मान्यवरांनी आप आपल्या परिसरातील गोरगरिब उपाशी राहू नये यासाठी सढ्ळ मदतीसाठी पुढाकार घ्यावे असे आव्हान काली मस्जिद कमिटीचे अध्यक्ष मसुद पठाण यांनी केले आहे

No comments:
Post a Comment