Monday, April 27, 2020

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे 9 लक्ष 75 हजार रुपये मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  9 लक्ष 75 हजार रुपये मदत



नांदेड ,(कालिदास अनतोजी)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचे  एक दिवसाचे वेतन  9 लक्ष 75 हजार 136 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता  निधी करिता आज कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. 
   कोविड -19 कोरोना साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता  निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकराव चव्हाण यांनी केले होते.
     त्यास प्रतिसाद देत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी  यांना निधी देण्याचे आवाहन केले होते.
     त्या नुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्या मार्च महिन्याच्या वेतनातील  एका दिवसाचे वेतनाचा  9लक्ष 75हजार 136 रुपयांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा धनादेश आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड चे  पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे  कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी  सुपूर्द केला. या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची उपस्थिती होती. 
    पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या वेळी विद्यापीठात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहीती घेतली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...