Monday, April 13, 2020

बाबांनो जीव महत्त्वाचा की पाचशे रुपये भोकरच्या बँकेसमोर तोबा गर्दी...

बाबांनो जीव महत्त्वाचा की पाचशे रुपये भोकरच्या बँकेसमोर तोबा गर्दी...



भोकर (एजास कुरेशी)
कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे  उल्लंघन होत असताना चित्र सध्या भोकर शहराततील एस.बी.आय. बँकेसमोर दिसत आहे

  घराबाहेर पडू नका सोशल डिस्टन्स चा पालन करा असे ओरडून ओरडून सांगून राहिलो काही ऐकायला तयार नाही आता हे भोकर च्या एस. बी. आय.  बँकांमधील चित्र पहा जिकडे-तिकडे लोकांची तोबा गर्दी का करत आहेत बरं हे सगळं कशासाठी तर अवघे पाचशे रुपये मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्यात आलेले पैसे काढण्यासाठी



सध्या देशात कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर शासना कडुन कलम १४४ लागु करण्यात आलेले आहे, दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेशीत केलेली संचारबंदी सुरू आहे, बंद काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने खुली ठेवतांना सोशल डिस्ट्ंस पाळण्याचे सक्त आदेश आहेत, भोकर येथिल बाजार समिती कडुन शेतकर्यांचा माल खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू आहे, समिती कडुन सोशल डिस्टंस पाळण्याचे ध्वनिक्षेपका वर वारंवार सांगितले जात असतांना येथे येणारा शेतकरी वर्ग सामाजीक अंतर न पाळता तोंडाला मास्क देखिल लावत नाही,  यामुळे नागरीकां कडुन चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...