लॉकडाऊन काळात या तालुक्यात २५ हजाराचा गुटखा जप्त
कालिदास अनतोजी
धर्माबाद : कोरोना सारख्या महामारीने सबंध मानवी जनजीवन विस्कळीत झालेले असतांना दुसरीकडे मात्र दारु,गुटखा, तंबाखू विक्री करणा-या तस्करांचं चांगभलं होत आहे.सध्या देशात लॉकडाऊन सुरू असल्याने महसूल विभागाचे भरारी पथक हे निश्चित वेळेत दुकाने बंद न करणारे व वीना परवाना सुरु ठेवणा-या दुकानांवर प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करत आहे तसेच एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. लॉकडाऊनमध्ये तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) रात्री छापा टाकून अंदाजित २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या एकवेळ पोटाला भाकरी मिळणे कठीण,परंतू व्यसनी लोकांना अवैधमार्गे दारु,गुटखा मात्र अवैध विक्रेते हे चढ्या दराने व सहज उपलब्ध करुन देतांना पहावयास मिळत आहेत.कारण होम लॉकडाऊन,संचारबंदी व आदी प्रकारचा अधिकचा कर्तव्यभार पोलीसांवर पडलेला असल्याचा गैर फायदा घेऊन ते लोक हा अवैध धंदा करत आहेत.
कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. त्यात सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. लॉकडाऊन दरम्यान तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढ्या भावाने धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री होत आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री जोमाने होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळाली व त्यांनी सर्व माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे

No comments:
Post a Comment