Wednesday, April 29, 2020

नांदेड़ मध्ये कोरोना रुग्ण वाढले अत्ता एक महिला रुग्ण संख्या झाली तीन

नांदेड़ मध्ये कोरोना रुग्ण वाढले अत्ता एक महिला रुग्ण संख्या झाली तीन 



नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये तीसरी  कोरोना पाॅझिटिव्ह  महिला रुग्ण आढळून आली आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. याबाबची माहिती अशी की नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका  महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस आले.ही महिला सेलूची जिल्हा परभणी येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
त्या महिलावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत 


सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनास कोरोनाग्रस्त  त्या महिले संदर्भात माहिती प्राप्त झाली असून त्या आधारेच प्रशासनाद्वारे आता त्या महिलेच्या संपर्कात सेलूतील कोणी कुटूंबिय किंवा अन्य व्यक्ती आल्या का, या संदर्भात तपासणी केली जाणार आहे.
सेलू येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 28 तारखेस ती महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती कळविली.
दरम्यान, प्रशासनाद्वारे ती महिला नेमकी कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, तीचे कुटूबिय कुठे आहेत, ती कोणा कोणाच्या संपर्कात आली. या संदर्भात नांदेड पाठोपाठ परभणी जिल्हा प्रशासनानेही माहिती घ्यावयास सुरुवात केली आहे.
  त्या महिलाच्या संप्रकात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावयाची आहे असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा नांदेड़ व परभनीचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...