विविध विषयांवर तहसीलदार यांच्याशी केली चर्चा !
धर्माबाद-(प्रतिनिधी) देशावर महामारी च्या माध्यमातून कोरोना च्या रूपाने एक भयानक संकट कोसळले असुन या रोगाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ात पाय पसरलेले आहे.
सुदैवाने आजपर्यंत नांदेड जिल्ह्य़ात एक ही रूग्ण पॉझिटिव्ह मिळाला नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे व जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर ,पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर ,व जिल्हाची आरोग्य यत्रंना यांच्या नेतृत्वाखालील सर्व टिमचे पक्षाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. तहसिल कार्यालय येथे तहसीलदार दतात्रय शिंदे यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आसून मागील अनेक महिन्यापासून विविध योजना तील निराधार व्यक्तींना मानधन वाटप झालेले नव्हते त्यामुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागच्या आठवड्यात त्वरित आदेश दिले व मानधन वाटपाला सुरवात झाली. धर्माबाद शहरातील व तालुक्यातील एकुण ४०३० लाभार्थी पैकी ३८०० लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून २३० लाभार्थी शिल्लक आहेत एकुण एक कोटी तीस लाख लाभार्थी यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती तहसीलदार दतात्रय शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली.
अनेक लाभार्थी यांचे फिंगरप्रिंट येत नसल्याने वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी कॉग्रेस कमिटी तर्फे करण्यात आली.
तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकान मार्फत वाटप होणाऱ्या धान्य संदर्भात व्यवस्थितपणे व योग्य नियमानुसार वाटप करण्याची
मागणी करण्यात आली.ऑनलाईन नसलेल्या शिधापत्रिका धारक कुटुंबाना अॅपद्वारे आधार नोदणी करून अन्नधान्य देण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले.
तेलंगणा राज्यामधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहती खबरदारी चा उपाय म्हणून दररोज शेजारच्या राज्यातुन येणारे दुधवाले,मालवाहतूक, सकाळी पहाटेच्या सुमारास येणारे पदयात्री,पायोनियर कंपनी ला येणारी वाहतूक ईत्यादी पुर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय संर्दभातही सविस्तर माहिती घेऊन किरकोळ त्रुटी बद्दल सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरात माहेश्वरी भवन येथे सी. सी. सी. सेंटर, संस्पेक्टीव्ह सेंटर, लेबर रूम,तसेच टेंम्परेचर मशीन-०५ अशी व्यवस्था करण्यात आल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण व मा. आ. वसंतराव चव्हाण यांनी धर्माबाद शहरातील प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब माणसाच्या सुख दुखात जाऊन मदत करण्याच्या सूचना करून कॉग्रेस पक्षाचे हेच ध्येय असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार येणाऱ्या काळात रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना सुद्धा धान्य वाटप करण्यात येणार आहे.
धर्माबाद तालुका व शहराच्या परिस्थिती वर लवकरच धर्माबाद कॉग्रेस कमिटी मा. पालकमंत्री यांची भेट घेणार आहे.
सदरील बाबतीत तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा करतेवेळी तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील चाेळाखेकर, बुथ कमिटी अध्यक्ष गोविंद पाटील रोषनगावकर, शहराध्यक्ष ताहेर पठाण, न पा सभापती निलेश पाटील बाळापुरकर,नगरसेवक प्रतिनिधी राजु सुरकुटवार,डॉ अनिलकुमार रत्नाळीकर, नगरसेवक सायारेड्डी गंगाधरोड,हानमंत नरवाडे,विठ्ठल कोडंलवाडे,मारोती डेबेकर,मार्केट संचालक शेख गौससाब, अल्पसंख्याक चे शेख माजीद, इंजि मोसिनखान,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment